“किसन वीर’ कार्यस्थळावर उद्या शहीदांना अभिवादन

भुईंज – 26/11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला परतवून लावताना आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या शहीदांना सोमवारी (दि. 26) सकाळी दहा वाजता किसन वीर कारखाना कार्यस्थळावरील 26/11 शहीद स्मृती स्मारकास अभिवादन करून मानवंदना देण्यात येणार आहे. मेढ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या प्रमुख उपस्थिती हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती, कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी दिली.

26 नोव्हेंबर 2008 रोजी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यात अशोक कामटे, विजय साळसकर, हेमंत करकरे, मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यासह जिल्ह्यातील विशेषतः कारखाना कार्यक्षेत्रातील तुकाराम ओंबळे, बापूराव धुरगुडे, अंबादास पवार, जयवंत दुधे-पाटील, बळवंत भोसले शहिद झाले.

कारखान्याने सामाजिक बांधिलकी व कर्तव्य भावनेने 26/11 हल्ल्यातील या शहिद पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्मारक कार्यस्थळावर उभारून आजच्या तरूण पिढीला जाज्वल्य देशभक्तीची प्रेरणा दिलेली आहे. गेल्या सात वर्षांपासून 26 नोव्हेंबरला कारखाना कार्यस्थळावरील या स्मारक परिसरात मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम आयोजित केला जात आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही या शहीदांना अभिवादन करून मानवंदना देण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)