किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा स्पर्धांमध्ये यश

वाई ः यशस्वी खेळाडूंचा सत्कार करताना प्रतापराव भोसले शेजारी मान्यवर.

वाई, दि. 25 (प्रतिनिधी)- येथील किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडुंनी विविध शालेय विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भरघोस यश मिळविले. सांगली येथील राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत कु. आकांक्षा प्रकाश शेलार हिने 3000 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत पार्थ लष्करे व आदिनाथ आवळे यांनी विविध गटात तृतीय क्रमांक मिळविला.
तसेच डेरवण, ता. चिपळूण येथे झालेल्या विभागीय मल्लखांब /रोप-मल्लखांब स्पर्धेत अनिकेत गोळे व पल्लवी शिंदे यांनी व्दितीय क्रमांक मिळविला. तसेच प्रसाद गोळे व सिद्धी चव्हाण यांनी चतुर्थ क्रमांक मिळविला. मिणचे ता. हातकणंगले या ठिकाणी झालेल्या विभागीय आर्चरी स्पर्धेत फिटाप्रकारमध्ये पृथ्वीराज काशिद याने प्रथम, संकेत शिर्के, व्दितीय व इंडीयन रांउड प्रकारामध्ये गौरव बडदरे तृतीय व विवेक महागंडे याने चतुर्थ क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्याची राज्यस्तरीय स्पर्धेकरीता निवड झाली. या खेळाडुंना प्राध्यापक सिकदंर अहिवळे, प्रा. सचिन चव्हाण, प्रा. मदन जाधव, प्रा. श्रीमती वनश्री कांबळे, सुधीर जमदाडे, चंद्रकांत भिसे, राजगुरू कोचळे, प्रसाद बेडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव भोसले यांच्या हस्ते खेळाडुंचा सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, सर्व संचालक, सचिव प्रा. जयवंतरावचौधरी, सहसचिव. नारायणराव चौधरी, प्राचार्य डॉ. चंद्रशेखर येवले, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र जाधव, पर्यवेक्षक प्रा. देवानंद शिंगटे, प्राध्यापक, कर्मचारी व सेवक यांनी खेळाडुंचे अभिनंदन केले.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)