“किसन वीर’च्या संचालकांवर कारवाई करा

स्वाभिमानाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; अन्यथा 18 सप्टेंबरला ठिय्या
सातारा – किसनवीर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी 31 ऑगस्टपर्यंत ऊसाचे पैसे देण्याचे लेखी आश्वासन देवूनही अद्याप अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे तात्काळ सर्व संचालकांवर कायदेशीर कारवाई करा, अन्यथा मंगळवार 18 सप्टेंबर रोजी कारखान्याच्या चेअरमनांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

शेतकऱ्यांना मागील हंगामातील ऊसाचे पैसे मिळावेत यासाठी स्वाभिमानाने दि. 20 ऑगस्ट रोजी कारखाना कार्यस्थळावर आंदोलन केले. त्यावेळी 31 ऑगस्टपर्यंत एफआरपी प्रमाणे पैसे देण्याचे लेखी आश्वासन कार्यकारी संचालकांनी दिले होते. मात्र, त्यानंतर 12 दिवस उलटूनही अद्याप शेतकऱ्यांना पैसे दिलेले नसून कारखान्याकडून फसवणूक करण्याचा प्रयत्न होत असल्याने आता जिल्हाधिकाऱ्यांनी संचालक मंडळावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी अर्जुन साळुंखे, अल्लाउद्दीन इनामदार, जीवन शिर्के, रमेश पिसाळ, संजय साबळे, देवानंद पाटील, दादा यादव, शहाजी पिसाळ, शंकर शिंदे, गणेश बोबडे आदी. उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)