किसनवीर कारखान्याला पैसे द्यायला लावणारच

सहकार मंत्री सुभाष देशमुख: शनिवारपर्यंतची मुदत दिली
सातारा- किसनवीर सहकारी साखर कारखान्याला शनिवार दि.15 पर्यंत शेतकऱ्यांचे पैसे देण्याची मुदत दिली असून आपण ते पैसे द्यायला लावणारच, असा आत्मविश्‍वास सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या कार्यक्रमानिमित्त ते साताऱ्यात आले होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आश्‍वासन दिले. त्यावेळी बॅंकेचे अध्यक्ष आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, संचालक अनिल देसाई, कांचन साळुंखे, सुरेखा पाटील आदी.उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी, किसनवीर कारखान्याने मागील हंगामातील ऊसाचे पैसे न दिल्याने साखर आयुक्तांनी कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी जप्ती आदेशाला स्थगिती दिली होती. यापार्श्‍वभूमीवर ना.देशमुख यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, राज्यात साखरेचे दर खाली आलेले असताना अनेक कारखान्यांना कमी दरात साखर विकावी लागली होती. मात्र, त्यानंतर सरकारने पुढाकार घेवून साखरेचे दर दोन हजार नऊशे रूपयांपर्यंत स्थिर केले.

दरम्यानच्या कालावधीत साखरेला कमी दर मिळालेले कारखाने अडचणीत आले होते. अशा कारखान्यांवर तसेच किसनवीर सारख्या कारखान्यांवर कारवाई करून पुढे ऊस उत्पादकांच्या अडचणीत वाढच होणार होती. हे लक्षात घेवून कारखान्यांना मुदतवाढ दिली होती. राज्यात अत्तापर्यंत विविध कारखान्यांनी 22 हजार कोटी थकीत देण्यांपैकी केवळ 450 कोटी रूपये देणे बाकी राहिले आहे. त्यापैकी किसनवीर कारखान्याला दि.15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून त्या दिवशीपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे हे द्यायलाच लावणार असे ना.देशमुख यांनी सांगितले.

कर्जमाफी विषयी बोलताना ना.देशमुख म्हणाले, राज्यातील 89 हजार शेतकऱ्यांना 34 हजार कोटी रूपये कर्जवाटप करण्यात आले असून अजूनही राज्यातील कोणताही शेतकरी वंचित राहू नये यासाठी तालुका स्तरावर समिती स्थापन केली असल्याचे त्यांनी सांगितले.

आदेश दिला तर माढ्यातून लढणार
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सन.2009 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून खा.शरद पवार यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्याबाबत त्यांना आगमी निवडणूकीत माढ्यातून लढणार आहात का असे विचारले असता ते म्हणाले, पक्षाचा आदेश आल्यास आपण अवश्‍य माढा लोकसभा मतदारसंघातून लढू.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)