किसनवीर कारखान्याने देणी न दिल्यास टाळे ठोकणार

शिवसेनेने दिला प्रशासनाला इशारा
सातारा,दि.11 प्रतिनिधी- किसनवीर साखर कारख्याने ऊस उत्पादक शेतकरी व कामागारांची देणी न दिल्यास टाळे घालण्याचा इशारा शिवसेनेच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारावकर यांना निवेदन देवून इशारा देण्यात आला आहे.
सन. 2017-18 वर्षात गाळप करण्यात आलेल्या ऊसाचे अद्याप पैसे देण्यात आले नाहीत. तसेच सवंग लोकप्रियतेसाठी 2 हजार 727 रूपये दर जाहीर करून सुध्दा अद्याप एफआरपीप्रमाणे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोसायटी कर्जावरील व्याजाचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे. याची जाणीव असून सुध्दा संचालक मंडळ कोणत्याही हालचाली करताना दिसून येत नाही. त्याचबरोबर कारखान्याची सद्य आर्थिक स्थिती काय आहे हे देखील जाहीर करण्यात येत नाही. तसेच काही शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति टन सतराशे रूपये जमा केले असले तरी त्यातून सोसायटीचे हप्ते वसूल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर कारखान्याच्या कामगारांचे वेतन देखील देण्यात आलेले नाही. त्यामुळे कारखान्याने सर्व देणी दिवाळीपुर्वी न दिल्यास युवा सेनेच्या वतीने कारखान्याला टाळा ठोकणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी युवासेना तालुका प्रमुख महेश शिर्के, नवनाथ पाटील, निलेश रसाळ, नितेश गादे, रोहित शेडगे, राजेंद्र शिंदे, विशाल पठारे, विठ्ठल पवार, रमेश बोराटे आदी.उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)