किश्‍तवार मध्ये लष्कराला पाचारण ; भाजप नेत्याच्या हत्येने निर्माण झाला तणाव 

file photo

जम्मू: जम्मू काश्‍मीरच्या किश्‍तवार जिल्ह्यात भाजपचे प्रदेश सेकेटरी अनिल परिहार आणि यांचे बंधु अजित यांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडल्यामुळे त्या परिसरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर तेथे लष्करी तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आंदोलकांनी उग्र आंदोलन सुरू करून पोलिसांवरही हल्ले केल्याची घटना घडल्यानंतर तेथे कालच संचार बंदी लागू करण्यात आली आहे. हत्येचा प्रकार काल घडला आहे.
अनिल परिहार हे त्यांचे बंधु आपले दुकान बंद करून घरी परत येत असताना त्यांच्यावर दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी अत्यंत जवळून गोळीबार केला. त्यात ते जागीच ठार झाले.

ही माहिती मिळताच आसपासच्या लोकांनी परिहार यांच्या निवासस्थाना जवळ मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तेथे चौकशीसाठी आलेल्या पोलिसांवरही लोकांनी हल्ला केल्याचा प्रकार घडल्यामुळे या परिसरात काल दक्षतेचा उपाय म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली. आज त्या भागात लष्कराच्या तकड्याही तेैनात करण्यात आल्या आहेत. गनिमांनी केलेल्या या हत्येच्या निषेध म्हणून अन्य ठिकाणीही त्याची उग्र प्रतिक्रीया उमटण्याची शक्‍यता लक्षात घेऊन प्रशासनाने किश्‍तवार सहित दोडा, भदेरवाह या ठिकाणी संचारबंदी लागू केली आहे. किश्‍तवार हा जातीय हिंसाचाराच्या संबंधात अत्यंत संवेदनशील जिल्हा आहे. तेथे हिंदु नेत्यांना लक्ष्य करून हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न गनिमांनी या आधीही अनेकवेळा केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान या हत्या प्रकरणाचा देशभरातून निषेध होत असून गृहमंत्री राजनाथसिंह यांनी या प्रकरणी तीव्र दुख: व्यक्त केले आहे. हल्लेखोरांना शोधण्यासाठी कोणतीही कसर बाकी ठेवली जाणार नाही असा निर्धार पोलिसांनी व्यक्‍त केला आहे. कॉंग्रेस व मार्क्‍सवादी कम्युनिसट पक्षाच्या नेत्यांनीही या हत्येचा तीव्र निषेध केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)