किशोर येवले यांची महासचिवपदी निवड

वाई – वाई तालुक्‍यातील पद्मश्रींचे गाव म्हणून ओळख असलेल्या पसरणी गावच्या किशोर येवले यांची अम्युचिल सिलंबन फेडरेशन ऑफ इंडियाच्या महासचिवपदी निवड झाल्याने गावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवल्याने पसरणी गावासह तालुक्‍यातील विविध खेळाडू व संघटनामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

अम्युचिल सिलंबन फेडरेशन ऑफ इंडियाची पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच भोलानाथ सिंग उपाध्यक्ष हॉकी इंडिया व मेम्बर ऑलम्पिक असोसिएशन यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे नुकतीच पार पडली या सभेत अध्यक्षपदी के.सेवलाकुमार -तामिळनाडू उपाध्यपदी अब्दुल रझाक -कर्नाटक राजेश थापा -पंजाब योगेश कारला -हरियाणा व महासचिवपदी किशोर येवले- महाराष्ट्र कोषाध्यक्षापदी विजयसिंग-झारखंड सदस्यपदी पोर्णिमा तेली, कुलदीप देवरे -महाराष्ट्र यांच्या बिनविरोध निवड करण्यात आल्या.

सिलंबन हा शिवकालीन युद्ध कलेचा प्रकार असून या मध्ये एकेरी काठी, दुहेरी काठी, काठी लढाई तलवार, भाला, दांडपट्टा, सुरुल हे खेळ खेळले जातात. हा खेळ भारतातील चोवीस राज्यामध्ये स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने खेळला जातो किशोर येवले हे 2011 मध्ये झालेल्या जागतिक सिलंबन स्पर्धेततील पाच सुवर्ण व एक कांस्य पदांचे जागतिक विजेते खेळाडू असून त्यांच्या तीस वर्षेच्या या खेळातील अनुभव पाहता त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली याचा फायदा या खेळात येणाऱ्या नवोदित खेळाडूना होणार आहे. त्यांच्या खेळातील आणि सामाजिक कार्यामुळे तालुक्‍यात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यांचा निवडीचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)