किवळे-रावेत बीआरटी मार्गावरील पथदिव्यांच्या खांबात विजेचा प्रवाह

देहुरोड – किवळे-सांगवी बीआरटी मार्गावरील किवळे -रावेत दरम्यानच्या भागातील दोन्ही बाजूंच्या रस्त्यावरील 15 पथदिव्यांच्या खांबाच्या वीज वाहिनीच्या भागावरील झाकणे गायब झाली असल्याचे वीजवाहिन्या उघड्या दिसत आहेत. या खांबातून विजेचा धक्‍का लागून अपघात होण्याची भीती व्यक्‍त होत आहे.

भोसरी येथे पुणे-नाशिक महामार्ग लगतच्या रस्त्याच्या पथदिव्याच्या खांबाला असलेल्या “स्वीच बटना’च्या पेटीला स्पर्श झाल्याने किरण जाधव या 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. या पार्श्‍वभूमीवर किवळे-सांगवी बीआरटी मार्गावरील किवळे-रावेत दरम्यानच्या दोन्ही बाजूंच्या पदपथा शेजारी बसविण्यात आलेल्या पथदिव्यांच्या सर्व खांबांची बुधवारी (दि. 21) पाहणी केली.

-Ads-

या पाहणीमध्ये 15 खांबांवरील वीज वाहिनीच्या “स्वीच बटण’ असलेल्या भागातील पेटीवरील लोखंडी झाकणे गायब झालेली असल्याचे दिसून आले आहे. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत असल्याने अशा खांबांवरील वीज वाहिनीच्या स्वीच बटण असलेल्या भागातून विजेचा धक्‍का लागून दुर्घटना घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)