किवळेत वेश्‍या व्यवसायाचा पर्दाफाश

पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने किवळे परिसरात साई लॉज येथे छापा टाकून 12 तरुणींची सुटका केली असून चार जणांना अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 4) करण्यात आली.

हरीश सिन्ही शेट्टी (वय-46), अभिषेक मोहन शेट्टी (वय-32, दोघे रा. साई लॉज, किवळे), रत्नाबहाद्दूर रनबहाद्दूर प्रधान (वय-34, रा. भोंडवेवस्ती, रावेत), बालाजी रामराव माने (वय-25, रा. सोमाटणे फाटा), शेखर दीपक सांडभोर (रा. किवळे), प्रवीण शेट्टी (रा. साई लॉज, किवळे), सागर भोंडवे, विनोद सदानंद शर्मा (दोघे रा. भोंडवेवस्ती, रावेत) यांच्या विरोधात “पीटा’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी हरीश, अभिषेक, रत्नाबहाद्दूर आणि बालाजी यांना पोलिसांनी अटक केली असून अन्य चौघेजण फरार आहेत.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किवळे परिसरात साई लॉज येथे वेश्‍या व्यवसाय चालत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या काही कर्मचाऱ्यांनी वेश्‍या व्यवसायाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची माहिती मिळवली. तसेच या लॉजवर डमी गिऱ्हाईक पाठवून सापळा रचला. याठिकाणी तीन मुलींची सुटका केली. हरीश आणि अभिषेक या दोघांकडे चौकशी करत वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या मुलींची माहिती काढली. भोंडवेवस्ती येथे या मुली राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारून नऊ मुलींची सुटका केली. पोलिसांनी मायक्रा कार, ऍक्‍सिस मोपेड आणि एक हिरो होंडा मोटारसायकल असा एकूण 2 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)