किवळेतील अपघातात तरुणाचा मृत्यू

देहूरोड – किवळे येथील मुकाई चौकात रविवारी (दि. 16) पहाटे दोनच्या सुमारास अपघातात तरूणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

राजकुमार ऊर्फ गणेश यशवंत कुवर (वय-23) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर, संतोष यशवंत कुवर (दोघे रा. साळुंब्रे, तळेगाव दाभाडे) या तरुणाने पोलिसांना अपघाताची माहिती दिली. राजकुमार याचा किवळे येथील चौकात अपघात झाल्याने तो गंभीर जखमी झाला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) त्याला दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. देहूरोड पोलीस तपास करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)