‘किल बिल’च्या हिंदी रिमेकसाठी हिरोईनचा शोध सुरू

तलवारबाजीच्या असामान्य स्कीलचे दर्शन घडवणाऱ्या “किल बिल’ या हॉलीवूडपटाचे हिंदी व्हर्जन लवकरच येणार आहे. हॉलीवूडचे दिग्दर्शक क्‍वांटिन टॅरेंटिनो यांच्या या असामान्य कलाकृतीची हिंदी आवृत्ती करण्याचे काम निखील द्विवेदीने स्वीकारले आहे.

मूळ इंग्रजी आवृत्तीमध्ये उमा थर्मनने ही अॅक्‍शन क्‍वीनची भूमिका साकारली होती. तिच्यासारखेच तलवारबाजीचे कौशल्य दाखवू शकणाऱ्या हिंदी अॅक्‍ट्रेसचा आता शोध सुरू झाला आहे. हॉलीवूडमध्ये हिरोईनने अॅक्‍शन सीन करणे ही काही अप्रुप वाटण्याजोगी गोष्ट मुळीच नाही. बॉलीवूडमध्येही हिरोईन अॅक्‍शन रोल साकारतात. मात्र स्त्री केंद्रीत पात्राने पूर्ण सिनेमाच आपल्या अॅक्‍शन स्कीलच्या आधारे तारून नेणे ही बाब आतापर्यंत दुर्मिळच आहे. म्हणूनच उमा थर्मनच्या तोडीस तोड अॅक्‍शन स्कील दाखवू शकेल अशी हिरोईन निखील द्विवेदी शोधत आहे. त्याच्यासमोर कतरिना कैफ, जॅकलीन फर्नांडिस, प्रियांका चोप्रा आणि अनुष्का शर्मा यांच्या नावांचे प्रमुख पर्याय आहेत.

निखील द्विवेदी सध्या बॉलीवूडमधील अन्य हिरोईनच्या नावांचाही विचार करत असल्याचे समजते आहे. रेमो डिसूझाने या रोलसाठी प्रियांका चोप्रा एकदम फिट असल्याचे सांगितले आहे. तर एलन अमीनने जॅकलीन फर्नांडिसच्या नावाची शिफारस केली आहे. “फोर्स 2’चा डायरेक्‍टर अभयने तर प्रियांकाच्या बरोबर अनुष्का आणि कंगणाच्या नावाचाही विचार करण्याची सूचना केली आहे. प्रियांकाने मेरी कोमच्या बायोपिकमध्ये आणि “गंगाजल 2’मध्ये आपले अॅक्‍शन स्कील दाखवले. तर कंगणा सध्या झाशीच्या राणीचा रोल करते आहे. कतरिनाने “टायगर जिंदा है’मध्ये अॅक्‍शन केली तर अनुष्काच्या वाट्याला अद्याप तसा कोणताच रोल आलेला नव्हता. नाही म्हणायला “नाम शबाना’मध्ये तापसी पन्नूने अॅक्‍शनचा धडाका दाखवून दिला होता. अजून निखील द्विवेदीने कोणाचीही निवड केलेली नाही. ज्या हिरोईनच्या वाट्याला हा रोल येईल तिच्यासाठी आपली इमेज उजळवायची ही खूपच चांगली संधी असणार आहे. यानिमित्ताने बॉलीवूडमध्ये अँग्री यंग वुमनचा ट्रेंडही सुरू होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)