किल्ले स्पर्धेचा पारितोषिक वितरण उत्साहात

मंचर- बजरंग दल-दुर्गावाहिनी आंबेगाव तालुका यांच्या वतीने दिपावलीनिमित्त मंचर, अवसरी खुर्द, महाळुंगे पडवळ, चांडोली खुर्द, वडगाव काशिंबेग येथे आयोजित ग्रुप किल्ले स्पर्धेत शिवशक्ती ग्रुप व टायटन सोशल स्पोर्टस फाउंडेशन मंचर यांना प्रथम क्रमांक मिळाला. विजेत्या स्पर्धकांना चांदीचे नाणे, सोन्याची नथ आणि रोख रक्‍कम देण्यात आली. बक्षिस वितरण मंचर येथील ग्रामपंचायत पटांगणात करण्यात आले. ग्रुप किल्ले, ग्रुप रांगोळी आणि व्यावसायिक रांगोळी स्पर्धेत 1250 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकास बजरंग दलाच्या वतीने मोफत किल्ले दर्शन घडविण्यात येणार आहे. किल्ले स्पर्धेतील विजयी संघ पुढीलप्रमाणे – शिवशक्ती ग्रुप-टायटन सोशल स्पोटर्स, पाच पांडव ग्रुप-धर्मवीर संभाजी ग्रुप, शंभुराजे प्रतिष्ठाण-विठ्ठल नवरत्न गणेश मंडळ, शंभुराजे ग्रुप-गोकर्णेश्‍वर प्रतिष्ठाण. रांगोळी स्पर्धा विजेते-स्नेहल सोमवंशी ग्रुप-प्रणाली थोरात ग्रुप, स्वामी समर्थ ग्रुप-अनिता लांडे ग्रुप, सोनल बांगर ग्रुप-पूजा घिसे ग्रुप, प्राची थोरात-विद्या साटवटे. व्यावसायिक रांगोळी स्पर्धेतील विजयी संघ : संदीप भालेराव, गणेश पांचाळ, कुंदन भालेराव, शुभम भालेराव. मंचर येथे झालेल्या बक्षिस वितरण समारंभास बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष ऍड. निलेश आंधळे, माजी सैनिक रमेश खरमाळे, रांगोळी कलाकार राजश्री भागवत, मंचर पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष वसंत बाणखेले, उद्योजक प्रविण मोरडे आदी उपस्थित होते. स्पर्धेचे नियोजन बजरंग दलाचे आंबेगाव तालुकाध्यक्ष संतोष खामकर, माजी उपसरपंच महेश थोरात, गणेश गाडे, कुणाल बाणखेले, सचिन पठारे यांनी केले. सूत्रसंचालन हेमंत चिखले यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)