किल्ले शिवनेरी लक्ष दिव्यांनी उजळला

शिवजयंतीनिमित्ताने गडावर शिवप्रेमींचा दीपोत्सव

जुन्नर- फाल्गुन वद्य तृतीयेला तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवात गुरुवारी (दि. 21) शिवनेरी किल्ल्यावरील शिवरायानच्या जन्मस्थानासह परिसरात दीपोत्सवासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गड लाखो दिव्यांनी उजळला होताण
सह्याद्री गिरीभ्रमण संस्था व परिसरांतील शिवप्रेमी यांच्या वतीने आयोजित दीपोत्सवाप्रसंगी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी गडावर विविध ठिकाणी पणत्या लावून सजावट करण्यात आली होती. जन्मास्थानासमोरील प्रांगणात भव्य सजावट केलेली रांगोळी काढण्यात आली होती. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांनी पोवाडे व शिवस्फूर्तीगीतांचे सादरीकरण केले. शिवनेर स्मारक समितीचे अध्यक्ष मधुकर काजळे, सह्याद्री गिरीभ्रमणचे राहुल गाजरे, संजय खत्री, धनंजय कुलकर्णी, गणेश कोरे, जितेंद्र देशमुख, गणेश खत्री, संदीप धानापुने, श्‍याम श्रोत्री, नितीन माळवदकर आदी यावेयी उपस्थित होते.

शनिवारी (दि. 23) शिवतृतीया असून, संपूर्ण दिवसभर गडावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवजन्मदिनी सकाळी 7 वाजता शिवाई मातेस अभिषेक, 8 वाजता छबिना पालखी मिरवणूक, शिवजन्म सोहळा व ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता हभप डॉ. मोहिनी विठ्ठल पाबळे यांना राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. दुपारी 12 वाजता गडपायथ्याशी महाप्रसादाचे आयोजन केले असून, सायंकाळी 6 वाजता जुन्नर शहरातून पालखी मिरवणूक व सांगता सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने देण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या गड संवर्धन समितीचे श्रमिक गोजमगुंडे, शिवव्याख्याते पराग ठाकूर, शिवनेरी स्मारक समितीचे अध्यक्ष हेमंत मावळे, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)