किल्ले बनवा स्पर्धेत 210 स्पर्धकांचा सहभाग

अवसरी- अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे बजरंग दलाच्या वतीने किल्ले बनवा स्पर्धेत 210 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत अजिंक्‍य संतोष भोर आणि अभय गणेश शिंदे यांनी प्रथम क्रमांक मिळवला असल्याची माहिती रोहित ढुमने यांनी दिली. दिवाळीच्या सुटीनिमित्त बजरंग दलाच्या वतीने किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेस अवसरी आणि परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत 210 स्पर्धक सहभागी झाले होते. प्रथम क्रमांक अजिंक्‍य संतोष भोर आणि अभय गणेश शिंदे यांनी मिळवला. द्वितीय पुरस्कार विकास तानाजी शिंदे आणि अभिनव गणेश भोर, तर तृतीय पुरस्कार सुयश मारुती शिंदे, ओम रवींद्र टेमकर आणि चतुर्थ क्रमांक वेदांत अंकुश टेमकर आणि रितेश भोसले यांनी मिळवला आहे. परीक्षक म्हणून सोहन भालेराव, शुभम भोर, अनिकेत भोर, रोहित शिंदे, अक्षय भोर, पंकज वायाळ, आदेश वाळके, संग्राम गावडे यांनी पाहिले. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्रके देण्यात आल्याची माहिती बजरंग दलाचे संयोजक सागर भोर यांनी दिली. कार्यक्रमाची व्यवस्था बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पहिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)