“किल्ले बनवा’ स्पर्धेतील विजेत्यांना अजिंक्‍यतारा किल्ल्याची मोफत भ्रमंती

वडगाव मावळ – येथील शिवराज ग्रुपच्या वतीने दिवाळीत आयोजित किल्ले बनवा स्पर्धेचे बक्षीस वितरण तसेच सहभागी स्पर्धकांना सातारा जिल्ह्यातील स्वराज्याची चौथी राजधानी किल्ले अजिंक्‍यतारा व सज्जनगड मोफत ऐतिहासिक सहल काढून रविवारी (दि. 18) सातारा येथील किल्ले अजिंक्‍यतारा येथे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

स्पर्धेचे हे सातवे वर्ष असून, रायगड, शिवनेरी, प्रतापगड, सिंहगड, पन्हाळा, वढू बुद्रुक, तुळापूर, किल्ले अकलूज आदी हुबेहूब किल्ले बनविण्यात आले होते. बालशाहीर विश्‍वजित गुरव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा सादर केला. 120 स्पर्धकांनी ऐतिहासिक सहलीचा मनमुराद आनंद घेतला. किल्ले बनवा स्पर्धेच्या किल्ल्यांचे परीक्षण अनिल कोद्रे, विवेक गुरव, अशोक पाटील व गणेश वायकर आदींनी केले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : खुला गट – प्रथम क्रमांक रोख रक्‍कम 5000 रुपये; स्वरांजली ग्रुप, द्वितीय क्रमांक रोख तीन हजार रुपये, अभिजित तपसे, तृतीय क्रमांक दोन हजार रुपये : बाल गणेश ग्रुप.
लहान गट : प्रथम क्रमांक तीन हजार रुपये : मिलिंदनगर मित्र मंडळ कोराईगड, द्वितीय क्रमांक दोन हजार रुपये : जयहिंद मित्र मंडळ जंजिरा, तृतीय क्रमांक रोख एक हजार रुपये, विराज वहिले, सिंहगड, अंतरीक्ष पुनमिया सिंधुदुर्ग, विनीत वहिले प्रतापगड.

स्पर्धेचे आयोजन संस्थापक अक्षय वायकर, अध्यक्ष रोहित गिरमे, कार्याध्यक्ष भाऊसाहेब ढोरे, सचिव सुहास विनोदे, कार्यक्रमप्रमुख तुषार वहिले, बाळासाहेब तुमकर, उपाध्यक्ष सोनु पिंजण, अतुल ढोरे, अजय म्हाळस्कर, खजिनदार सतीश ढोरे, राहुल ढोरे, तुषार हुलावळे आदींनी केले. प्रास्ताविक अक्षय वायकर यांनी केले. सूत्रसंचालन सुहास विनोदे यांनी केले. रोहित गिरमे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)