किल्ले पुरंदरवर दुर्गपूजेचे आयोजन

सरदार गोदाजीराजे जगताप प्रतिष्ठानचा उपक्रम

सासवड- सरदार गोदाजी राजे जगताप प्रतिष्ठानने शिवाजी ट्रेल संघटनेच्या वतीने देशभरातील गडकिल्ल्यांवर ऐतिहासिक दुर्गपूजा सोहळ्याचे आयोजन केले होते. या उपक्रम अंतर्गत सोमवारी (दि. 25) सासवड येथील किल्ले पुरंदरवर विधीवत दुर्गपूजा करण्यात आली. यावेळी जय शिवाजी राजे, जय संभाजीराजे, जय गोदाजी राजे या जयघोषाने किल्ले पुरंदर परिसर दणाणून गेला होता.
यावेळी किल्ले पुरंदरला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटक, शालेय विद्यार्थ्यांना सरदार गोदाजी राजेंच्या किल्ले पुरंदरवरील इतिहासातील दुर्लक्षित पराक्रमाची माहिती देण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे संग्राम जगताप, नंदकुमार जगताप, उर्मिला जगताप, भुषण जगताप, दीपक जगताप, अजयकुमार जगताप, एन. आर. जगताप, मुरारबाजी देशपांडेंचे 13वे वंशज संदीप पोतनीस, धनदीप राजे देसाई, संतोष हगवणे, बाबुराव दोडके, प्रमोद मोर्टी आणि इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)