किलीमंजारो शिखर सर; मातृ-पितृ सेवेचा संदेश

पिंपरी- युरोपातील सर्वात उंच शिखर माउंट एलब्रूस आणि आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किलीमांजारो हे शिखर सर करून भारताचा झेंडा फडकवून मातृ-पितृ सेवेचा संदेश दिल्याबद्दल पिंपळे निलख येथील रहिवासी सचिन कणसे यांचा महापालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या चंद्रपूर येथील गिर्यारोहकांचा स्थायी समितीच्या वतीने स्थायी समिती सभापती ममता गायकवाड व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन गौरव करण्यात आला.
चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी भागातील हे विद्यार्थी पिंपरी चिंचवड शहरात ज्ञान प्रबोधिनी विद्यालयामध्ये प्रशिक्षणासाठी आले आहेत. माउंट एव्हरेस्ट शिखर सर करून त्यांनी महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर घातली आहे. यामध्ये उमाकांत मडावी, काविदास काटमोडे, प्रमेश आले, विकास सोयाम, शुभम पेंदारे, आकाश मडावी, अक्षय आत्राम, मनिषा धुर्वे, छाया आत्राम, इंदु कन्नाके या उमाकांत मडावी, काविदास काटमोडे, प्रमेश आले, विकास सोयाम, शुभम पेंदारे, आकाश मडावी, अक्षय आत्राम, मनिषा धुर्वे, छाया आत्राम, इंदु कन्नाके या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सत्कार समारंभाच्यावेळी नगरसेवक विलास मडीगेरी, मोरेश्‍वर भोंडवे, राजू मिसाळ, अमित गावडे, राजेंद्र गावडे, सागर आंगोळकर, विकास डोळस, नगरसेविका करुणा चिंचवडे, नम्रता लोंढे, गीता मंचरकर, आरती चोंधे, प्रज्ञा खानोलकर, सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, अर्चना बारणे, साधना मळेकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)