किराणा दुकानातील तेल डब्यांवर डल्ला

अपशिंगेत 60 हजारांचा किराणा माल लंपास
नागठाणे, दि. 1 (प्रतिनिधी) – अपशींगे (मिलिटरी) ता. सातारा येथे बुधवारी रात्री होलसेल किराणा मालाचे दुकान चोरट्याने फोडून सुमारे 60 हजारांचा किराणा माल लंपास केला. चोरट्याने तेलाचे डब्बे व संतूर साबणासह सीसीटीव्ही कॅमेरा व डिव्हीआर मशीनची चोरून नेली. दुकानमालक शिवराज विजय राणभरे (रा. अपशींगे (मि.) ता.सातारा) यांनी गुरुवारी दुपारी बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव-अपशींगे रोडलगत शिवराज राणभरे यांचे प्राची होलसेल किराणा मालाचे दुकान आहे. बुधवारी रात्री 9 वाजता नेहमीप्रमाणे दुकान बंद करून ते घरी गेले. गुरुवारी सकाळी त्यांनी दुकान उघडले असता दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. यावेळी त्यांना दुकानातील तेलाचे डबे गायब असल्याचेही निदर्शनास आले.बुधवारी रात्री उशिरा चोरट्याने दुकानाच्या पाठीमागील भिंतीला पत्र्याच्या साहाय्याने बंद केलेल्या खिडकीचा पत्रा काढून व त्याशेजारील भिंतीच्या विटा काढून आत प्रवेश केला. दुकानातील जेनिमी कंपनीचे 46 तेलडबे, संतूर साबणाचा मोठा बॉक्‍स तसेच आतील एक सीसीटीव्ही कैमरा व डिव्हीआर मशीन असा सुमारे 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. घटनास्थळी श्वानपथक व ठसे तज्ज्ञाना पाचारण करण्यात आले होते. श्वान बोरगाव – अपशींगे रस्त्यालगतच घुटमळले. ही चोरी सुमारे चार ते पाच चोरट्यानी केली असल्याची शक्‍यता बोरगाव पोलिसांनी वर्तवली. या घटनेची फिर्याद शिवराज राणभरे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली असून तपास सपोनि संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वसंत जाधव करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)