किराईताचे अनेक औषधी उपयोग आहेत. किराईताला वैद्य लोकांनी हाडीतापाची शिरशिरी म्हटलं आहे ते उगाच नव्हे कारण सर्व प्रकारच्या तापामध्ये रामबाण उपाय किराईताचा होतो. 
सर्व प्रकारच्या ज्वरावर – कोणत्याही प्रकारचा ताप किराईताने बरा होतो.काडेकिराईत तापावर उत्तम औषध आहे. हे जीर्णज्वरावरही उत्तम औषध आहे. 10ग्रॅम किराईत किंचित ठेचून 30 मि.ली. कढत पाण्यात रात्री भिजत घालावे. सकाळी ते पाणी गाळून त्यात 10 ग्रॅम मध व 3 ग्रॅम खडीसाखर घालून द्यावे, जीर्णज्वर निघतो,एकसारखा न उतरता येणारा मोठा ताप म्हणजे सन्निपातज्वर. यावर किराईत हे औषध आहे. वीस ग्रॅम काडेकिराईत कुटून एक ग्रॅम सुंठ ठेचून या दोहोंचा अर्धा लिटर पाणी घालून मंदाग्नीवर अष्टमांश काढा करावा आणि तो सांजसकाळ घ्यावा. याने घाम येऊन त्वरित ताप उतरतो. चांगली भूक लागून शक्‍ती येते.
ज्वराच्या शिरशिरीवर – कधी कधी मोठा ताप येऊन गेल्यावर अंगातून शिणका निघून थंडीने कापरे भरल्यासारखे होते, अशी स्थिती दिवसातून दहा पाच वेळा होते. ह्याला वैद्यलोक हाडीतापाची शिरशिरी असे म्हणतात. यावर काडेकिराईत रात्री कोमट पाण्यात भिजत घालून सकाळी गाळून घ्यावे, ज्वराची शिरशिरी थांबते.
घशाच्या जळजळीवर – काडेकिराईत थंड आहे. घशाची जळजळ याचा काढा करून साखर घालून घेतल्याने थांबते. अशाप्रकारे काडे किराईत हे अत्यंत गुणकारी औषध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)