किरण बेदींकडून अधिकाराच्या गुप्तता शपथेचा भंग…

मुख्यमंत्री नारायण सामी यांचा आरोप
पदुच्चेरी – अधिकृत पातळीवर झालेला गुप्त पत्रव्यवहार पदुच्चेरीच्या राज्यपाल किरण बेदी यांनी सोशल मिडीयावर प्रसारीत करून त्यांनी गुप्ततेच्या शपथेचा भंग केला आहे असा आरोप पदुच्चेरीचे मुख्यमंत्री व्ही नारायणसामी यांनी केला आहे. त्या घटनात्मक पदावर काम करण्याच्या योग्यतेच्या नाहींत अशी टिपण्णीही त्यांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या संबंधात त्यांनी किरण बेदी यांना पत्र पाठवून त्यात त्यांनी नमूद केले आहे एक प्रशासक म्हणून शपथ घेताना त्यांनी सरकारी गुप्ततेची शपथ घेतली आहे. पण आपण सरकारी कामकाजाचा भाग असलेले प्रत्येक महत्वाची गुप्त पत्रे सोशल मिडीयावर जाहीर केली आहेत. हा सरळ सरळ शपथेचा भंग आहे असे त्यांनी म्हटले आहे. राज्यपाल रोजच अधिकाऱ्यांना परस्पर विरोधी आदेश देत आहेत त्यामुळे त्यांच्यात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

अधिकाऱ्यांनी राज्यपालांचे आदेश मानू नयेत त्याकडे दुर्लक्ष करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. राज्यपालांनी आपले वर्तन मंत्रिमंडळाच्या सल्ल्यापुरते मर्यादित ठेवले तर आम्हीही राज्यपालांना सहकार्य करू असेही नारायण सामी यांनी म्हटले आहे. राज्यपाल किरण बेदी यांनी जनतेच्या कल्याणाच्या अनेक योजना अडवून ठेवल्या असून त्यामुळे प्रशासनाच्या कामात त्यांच्यामुळे अडथळा निर्माण होत आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)