किरकोळ विक्रेत्यांकडून रस्त्यावरच कचरा

नगरपरिषदेच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज शहरात "भीक मांगो आंदोलन' करत नगरपरिषदेचे लक्ष वेधले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रमेश खरात, संतोष मोहिते, राजू गायकवाड, बाबा साळवे, सुनील बोरुडे व इतर.

बिबवेवाडी – मार्केट यार्ड भाजी मार्केट परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून यामुळे परिसरात साथिच्या आजारांना आयते निमंत्रण मिळत आहे. शहरातील मोठे व मुख्य भाजी मार्केट असल्याने येथे हजारोच्या संख्येने नागरिकांची वर्दळ असते. परंतु भाजी मार्केट जवळ मुख्य रस्त्यावर बरेच किरकोळ फळ विक्रेते व भाजी विक्रेते खराब माल रस्त्यात टाकतात असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले दृश्‍य पाहण्यास मिळते.
रस्त्यावर सुका कचरा वाऱ्यामुळे दुचाकी चालकांच्या डोळ्यात जातो यामुळे किरकोळ अपघात होतात. येथील स्थानिक रहिवाशांना यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतो. रस्त्याने चालताना पादचाऱ्यांना दुर्गंधीमुळे नाक दाबून चालावे लागते. या घाणीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात डास झाले आहेत, अशी तक्रार येथील नागरिकांनी व्यक्त केली.
तसेच अनधिकृतपणे व्यवसाय करणारे व्यापारी हा कचरा रस्त्यालगतच जाळतात असल्याने परिसरात धुरांचे लोट निर्माण होऊन वायू मोठ्या प्रमाणात वायुप्रदुषण होते. तसेच त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. येथे जवळच असलेल्या लालबाग व इतर रहिवासी सोसायट्यांना याचा त्रास सहन करावा लागतो. यामुळे या परिसरात भटक्‍या कुत्र्याच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. यासर्व बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. तरी प्रशासनाने येथील कचरा तातडीने उचलावा. तसेच अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)