किरकोळ वादावादीत एकावर चाकूने वार

नागठाणे – ऊस तोडणी कामगारांमध्ये किरकोळ कारणांवरून झालेल्या वादावादीत एकावर चाकूने वार करून गंभीर जखमी करण्याची घटना खोडद (ता. सातारा) येथे घडली.अमोल शंकर शिंदे (मूळ रा. आष्ठे ता. परतुड जि. जालना) असे जखमीचे नाव असुन बोरगाव पोलिसांत या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे.गुरुवारी रात्री ही घटना घडली.

खोडद येथे ऊसतोड कामगारांची पाले पडली आहेत. गुरुवारी सकाळी येथील अमोल शिंदे हा पत्नी व पालातील अन्य कामगारांसोबत ऊस तोड करण्यासाठी गेले होते. यावेळी दुपारी रतन शंकर शिंदे, कैलास शंकर शिंदे व शिवा रामू शिंदे यांनी अमोल शिंदे याच्यांची किरकोळ कारणावरून भांडणे केली. यावेळी रतन शिंदे, कैलास शिंदे व रामू शिंदे यांनी अमोल्यास मारहाण केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मारहाण सोडविण्यासाठी अमोलची पत्नी निर्मला शिंदे मध्ये पडल्या. यावेळी कैलास शिंदे याने चाकूने अमोलच्या कमरेत वार केला. यामध्ये अमोल शिंदे जखमी झाल्याने त्याला प्रथम नागठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व तेथून जिला रुग्णालय, सातारा येथे पाठवण्यात आले. या घटनेची फिर्यात रात्री उशिरा सौ. निर्मला शिंदे यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात दाखल केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)