किरकोळ वादातून एकाचा खून

पिंपरी- एकाच ठिकाणी काम करत असलेल्या तरुणांमध्ये दुचाकी मागण्यावरुन झालेल्या भांडणात एका तरुणाचा खून झाला आहे.

एमआयडीसी भोसरी पोलिसांनी या प्रकरणी अमीर हुसैन शेख (वय 22, रा. पत्राशेड, लिंकरोड, पिंपरी) व कृष्णा गणेश भोसले (वय 19, रा. बालाजीनगर, भोसरी) या दोघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना भोसरीतील बालाजीनगर येथे रविवारी रात्री साडेअकरा वाजता घडली असून सतिश ज्ञानोबा इंदले (वय 19 रा. बालाजीनगर भोसरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी लखन गायकवाड (वय 27, रा. एमआयडीसी भोसरी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. गायकवाड यांचे भंगार मालाचे दुकान असून मयत इसम आणि आरोपी काम करतात. सतीश ने अमीरकडे दुचाकीची चावी मागितली. मात्र, अमीर ने त्याला नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली. आरोपींनी सतिश इंदलेला लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करून त्याचा गळा दाबून जीवे ठार मारले. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गुन्हे आर. एल. विभांडीक पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)