किरकोळ बाजारात कोथिंबिरी 25 रुपये

पालेभाज्यांचे भाव कडाडले

पुणे – उन्हाळ्यामुळे पालेभाज्यांची आवक घटल्यामुळे तसेच मागणी जास्त असल्याने सर्वच पालेभाज्यांचे भाव कडाडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. कोथिंबिरीच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत सर्वाधिक वाढ झाली आहे. शेकडा जुडीमागे 500 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या जुडीला दर्जानुसार 8 ते 17 रुपये मोजावे लागत आहेत. तर, किरकोळ बाजारात 15 ते 25 रुपयांनी कोथिंबिरीच्या जुडीची विक्री होत असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
कोथिंबिरीनंतर मेथीच्या भावात घाऊक बाजारात शेकडा जुडीमागे 200 रुपयांनी वाढ झाली आहे. मेथीच्या जुडीसाठी घाऊक, किरकोळ बाजारात अनुक्रमे 4 ते 8 आणि 10 ते 12 रुपये मोजावे लागत आहेत. उर्वरित सर्व पालेभाज्यंच्या भावात शेकडा जुडीमागे 50 ते 100 रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात पालेभाज्यांच्या जुडीचे भाव कडाडले आहेत. आवक घटल्याने पालेभाज्यांच्या भावात वाढ झाली आहे. रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिरीची सुमारे 1 लाख जुडी, तर मेथीची अवघी 30 हजार जुडीची आवक झाल्याचे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : 800-1700, मेथी :400-800, शेपू : 500-800, कांदापात : 500-600, चाकवत : 500-800, करडई : 400-500, पुदिना : 100-200, अंबाडी : 400-500, मुळे : 500-800, राजगिरा : 500-700, चुका : 700-800, चवळई : 500-800, पालक : 400-700, हरभरा गड्डी: 400-600.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)