किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण

पिंपरी – पाण्याच्या टॅंकरवरील चालकाने किरकोळ कारणावरुन तरुणास बेदम मारहाण केली. ही घटना हिंजवडी वाकड रोडवर पंचरत्न चौकात मंगळवारी (दि. 13) पहाटेच्या सुमारास घडली.

दामोदर बाळासाहेब कदम (वय-38, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शशिकांत गोरख साखरे (वय-32, रा. हिंजवडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-

शशिकांत यांचा पाण्याचा टॅंकर आहे. दामोदर त्यांच्या कारमधून हिंजवडी वाकड रोडवरून पंचरत्न चौकातून जात असताना शशिकांत याने त्याचा पाण्याचा टॅंकर दामोदर यांच्या कारला आडवा लावला. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. यामध्ये शशिकांत याने टॅंकरमध्ये ठेवलेला लोखंडी पाना दामोदर यांच्या डोक्‍यात मारला. यामध्ये दामोदर जखमी झाले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक मिलन मुरकुटे तपास करीत आहेत

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)