किरकोळ कारणावरुन पोलीस शिपायाला धक्काबुक्की

पुणे – किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून दोन कार चालकांनी पोलीस शिपायाला धक्काबुक्की केली, तसेच या कारचालकांनी पोलीसाच्या अंगावर गाडी घालून त्यांना एक ते दीड किलोमीटर फरफटत नेले. 27 जानेवारी रोजी सांयकाळी सव्वा पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास सेनापती बापट रस्त्यावरील चतु:श्रुंगी मंदिराच्या पायथ्याजवळ ही घटना घडली. चतु:श्रुंगी पोलीसांनी याप्रकरणी दोनजणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून ते पसार झाले आहेत.

दिपक सोनी आणि त्याच्या अन्य एका साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतु:श्रुंगी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक हेमंत खरात यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार; खरात आणि त्याचे सहकारी हे चतु:श्रुंगी मंदिराच्या पायथ्या जवळ बंदोबस्त करत होते. त्यावेळी सोनी आणि त्याचा सहकारी तेथे आला, त्यावेळी खरात आणि सोनी यांचा वाद झाला. या वादातूनच सोनी आणि त्याच्या साथीदारांनी खरात यांच्या अंगावर गाडी घातली आणि त्यांना एक ते दीड किलोमीटर फरफटत नेले. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)