किरकोळ कारणातून शेजाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी

पिंपरी – शिवीगाळ केल्याच्या रागातून दोन कुटुंबीयांमध्ये शुक्रवार दि. 26 ला सायंकाळी पाचच्या सुमारास सूस रस्त्यावरील तापकीरनगर परिसरात तुंबळ हाणामारी झाली. हिंजवडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

मुरलीधर अर्जुनराव सोळंके (वय- 50, रा. निम्हण चाळ, तापकीरनगर) यांनी फिर्याद दिली आहे. दीपक सुनील साळवे (वय 34, रा. सुस रोड) याला अटक केली आहे. सुनील गुलाबराव साळवे (वय 48), नंदा साळवे, शरद साळवे (सर्व रा. सूसरोड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सुनील साळवे यांच्या फिर्यादीनुसार अक्षय मुरलीधर सोळंके, गोपी मुरलीधर सोळंके यांना अटक झाली व मुरलीधर सोळंके, शुभ सोळंके यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसऱ्या तक्रारीत सोळंके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते शुक्रवारी सायंकाळी कामावरून घरी आले, तेव्हा आरोपी साळवे शिवीगाळ करीत होता. सोळंके यांनी साळवेला तू शिवीगाळ का करत आहेस? असे विचारले. या रागातून साळवेने त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच साळवे यांच्या कुटुंबीयांनी सोळंके यांच्या पत्नी, मुलगा व मुलीलाही शिवीगाळ करत दगडाने मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक डी. एन. निकम पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)