किरकसाल हे अधिकाऱ्यांचे गाव म्हणून नावारूपाला येईल

किरकसाल : लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल सचिन काटकर यांचा सत्कार करताना प्रवीण इंगवले. (छाया ः संदीप जठार)

गोंदवले, दि. 28 (प्रतिनिधी) – प्रशासकीय अधिकारी होण्याचा वाढता आलेख हा माणचा मान उंचावत असून आगामी काळात किरकसाल हे अधिकाऱ्यांचे गाव म्हणून नावारूपाला येईल, असे मत पोलीस अधीक्षक प्रवीण इंगवले यांनी किरकसाल (ता.माण)येथे व्यक्त केले.
किरकसालचे सुपुत्र सचिन काटकर यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल आयोजित केलेल्या सत्कार समारंभात इंगवले बोलत होते. प्रारंभी किरकसाल माध्यमिक विद्यालयाचे झांज पथकाच्या निनादात गावच्या वेशीपासून श्री भैरवनाथ मंदिरापर्यंत सत्कारमूर्तींची रथातून मिरवणूक काढण्यात आली. यानंतर किरकसालच्या गौरी कुंभार यांचा नेट सेट परीक्षेत यश मिळविल्याबद्दल तसेच सचिन काटकर (किरकसाल), वैभव धनवडे (कुकुडवाड), कृष्णा काटे (भालवडी), नितीन नरळे (पर्यंती), अतुल मडके (वाघमोडेवाडी) यांचा पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल तर शिंगाडे व बनसोडे यांचा निरोपानिमित्त प्रवीण इंगवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रवीण इंगवले म्हणाले, स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे. जेणेकरून सामान्य ज्ञानात मोठी भर पडेल. यावेळी सचिन काटकर म्हणाले, यशासाठी खडतर कष्टाशिवाय पर्याय नाही. माझ्या खडतर कष्टाला प्रोत्साहन देणाऱ्या किरकसालच्या मातीचे ऋण कधीच विसरू शकणार नाही.
माण खरेदी-विक्री संघाचे चेअरमन बाबूराव काटकर, मुख्याध्यापक भुजबळ, इतिहास संशोधक रावसाहेब देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच अमोल काटकर यांनी सूत्रसंचालन केले. सुनिल काटकर यांनी प्रास्ताविक केले तर यांनी आभार मानले.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)