किम जोंग ऊन चीनमध्ये दाखल – चीनने दिली अमेरिकेला खबर

बीजिंग (चीन) – उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग ऊन गुप्तपणे चीनमध्ये पोहचल्याच्या शंकाकुशंकांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कालपर्यंत गूढ असलेली गोष्ट आता स्पष्ट झाली आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग ऊन हे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या आमंत्रणावरून चार दिवसांच्या दौऱ्यावर सपत्निक चीनमध्ये दाखल झाल्याची माहिती आता अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.

किम जोंग ऊन हे चीनच्या दौऱ्यावर आल्याची माहिती राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांना कळवल्याचे चीनच्या राष्ट्रपती कार्यालयाने एका निवेदनाद्वारे जाहीर केले आहे. किम जोंग ऊन यांनी आपला अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रांचा कार्यक्रम थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती चीनची राष्ट्रीय वृत्तसंस्था शिन्हुआ ने दिली आहे. सोबत शी जिनपिंग आणि किम जोंग ऊन यांचा फोटोही प्रसिद्ध केला आहे.

शी जिनपिंग यांनी किमा जोंग ऊन यांचे शाही स्वागत करून त्यांच्यासाठी ग्रेट हॉल ऑफ पीपलमध्ये शाही भोजनाचे आयोजन केले. भोजनादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. उत्तर कोरिया अमेरिकेबरोबर चर्चा करण्यास आणि शिखर संमेलनास तयार असल्याचे किम जोंग ऊन यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी शी जिनपिंग यांना उत्तर कोरियाच्या भेटीसाठी आमंत्रण दिले.

द्विपक्षीय संबंध, दोन्ही देशांमधील अंतर्गत स्थिती, कोरियन द्वीपकल्पावर स्थायी शांती आणि स्थैर्य स्थापित करण्यासह अनेक विषयांवर शी जिनपिंग यांच्याशी आपली सफल चर्चा झाल्याचे किम जोंग ऊन यांनी नंतर सांगितले. शी जिनपिंग हे सलग दुसऱ्यांदा चीनचे राष्टृापती झाल्याबद्दल, सीपीसीचे महासचिव झाल्याबद्दल आणि सीपीसी केंद्रीय सैन्य आयोगाचे अध्यक्ष झाल्याबद्दल किम जोंग ऊन यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)