किमान 50 वर्षे सत्तेत राहू: अमित शहा

अमित शहा यांचा विश्‍वास

नवी दिल्ली: भाजप किमान 50 वर्षे देशात सत्तेवर राहिल, असा विश्‍वास पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी व्यक्‍त केला आहे. देशातील प्रत्येक मतदारसंघात, प्रत्येक बुथमध्ये भाजपचा विजय होणे अनिवार्य आहे, असे पंतप्रधानांनी देशातील कार्यकर्त्यांना सांगितले असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली. या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांकडून होत असलेल्या टीकेचा जोरदार समाचार घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“ज्यांचे सरकार अपयशी ठरले, ते विरोधातही अपयशी ठरले आहेत. आमच्या सरकारच्या 48 महिन्यांच्या सरकारची कामगिरी कॉंग्रेसच्या 48 वर्षांच्या कामगिरीच्या तुलनेत तपासली जाईल. 2019 च्या निवडणूकात भाजप विजयी होईल. किमान 50 वर्षे भाजपला सत्तेतून कोणीही हटवू शकणार नाही.’ असे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी सांगितल्याचे प्रसाद म्हणाले.

काल कार्यकारिणीच्या बैठकीच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलताना अमित शहा यांनी विरोधकांवर शहरी नक्षलवाद्यांना अर्थसहाय्य पुरवण्याचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट करणाऱ्यांना पाठिंबा देण्याचा आरोप केला होता. भीमा कोरेगाव प्रकरणाशी संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई केल्याबद्दल अमित शहा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केल्याचे केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)