किमान माझी गळाभेट राफेल करार नाही -सिद्धू

नवी दिल्ली: पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू सरकारवर निशाणा साधला आहे. ऑगस्टमध्ये पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची भेट घेतल्यानंतर सिद्धू यांनी कर्तारपूर साहिबसंदर्भात पाकच्या लष्करप्रमुखांची भेट घेतल्याचा दावा केला होता. कर्तारपूर येथील सीमा पाकिस्तानकडून खुली करण्याचे आश्वासन जनरल बाजवा यांनी दिले होते.

दरम्यान, पाकिस्तानने गुरू नानक यांच्या ५५० जयंतीनिमित्त कर्तारपूर मार्गिका खुली करत असल्याचे जाहीर केले. यावर प्रतिक्रिया देताना सिद्धू यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला ‘पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट शेवटी कामी आली. १५ ते १६ कोटी लोकांसाठी ही गळाभेट अमृतासारखीच ठरली. किमान माझी गळाभेट ही राफेल करार नाही हे स्पष्ट झाले , असा खमका टोला त्यांनी लगावला आहे.

-Ads-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
30 :thumbsup: Thumbs up
9 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)