किन्नूर सफरचंद बाजारपेठेत दाखल

पुणे – गोड चवीचे किन्नूर सफरचंद सातारा फळ बाजारात दाखल झाले आहे. उत्तम दर्जाच्या परदेशी सफरचंदा इतकेच गुणवत्ता असलेल्या या सफरचंदाला सातारकरांची मागणी असल्याचे युसूफ बागवान यांनी सांगीतले. सध्या या सफरचंदाची मागणी वाढली आहे. प्रती दहा किलोस हजार ते चौदाशे रुपये भाव मिळत आहे.

ही सफेरचंदे भारत-चीन सीमारेषेलगतच्या गावातून विविध शहर दाखल होतात.
यंदाच्या पिकास पोषक वातावरण राहिल्याने फळांचा दर्जा तसेच गोडी चांगली आहे. तसेच, गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजारात आवकही चांगल्या प्रमाणात होत आहे. इतर सफरचंदाच्या तुलनेत हे थोडेसे महागडे आहे. तरीही चव उत्तम असल्याने या फळाची स्टॉलधारक, मॉलवाल्यांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यास येत आहे. परदेशी सफरचंद ही शीतगृहात जास्त काळ ठेवली जातात. त्यातुलनेत, देशी सफरचंद हे तोडणी करून फळबाजारात विक्रीसाठी पाठविली जातात. त्यामुळे, प्रक्रिया केलेल्या फळांपेक्षा ताजी फळे खाणे आरोग्यास फायदेशीर आहे. किन्नूर जातीच्या सफरचंदाची आवक वाढल्यावर याच्या दरात घट होईल असे ही बागवान यांनी सांगीतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)