किनारा हॉटेलमधील वेश्‍याव्यवसाचा पदार्फाश

पोलिसांनी केली दोघांना अटक : तर दोन तरूणींची सुटका केली

पुणे – सातारा रस्त्यावरील किनारा हॉटेलमध्ये सुरू असलेला वेश्‍या व्यवसायाचा भारती विद्यापीठ पोलिसांनी छापा टाकून पर्दाफाश केला. हॉटेलच्या मॅनेजरसह दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या तावडीतून दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

मॅनेजर अनिल श्रीधर पुजारी (वय 34, रा. किनारा हॉटेल, मूळ.कर्नाटक), चितरंजन दामोदर शेट्टी (वय 36, कर्नाटक), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, एक महिला पसार झाली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात वेश्‍याव्यावसायासह अवैध धंदे छुप्या पद्धतीने सुरू आहेत.

मात्र, या धंद्यांवर नजर ठेवून त्यावर कारवाई करण्याचे आदेश नवनियुक्‍त आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पदभार स्वीकारताच दिले होते. दरम्यान गुन्हे शाखेलाही यावर कारवाई करण्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, कात्रज भागातील सातारा रस्त्यावर असणाऱ्या किनारा हॉटेलात वेश्‍या व्यवसाय सुरू असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विष्णू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक वैशाली भोसले आणि पथकाने याठिकाणी छापा टाकून कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)