किती सुरक्षित आहे तुमचे घर (भाग-२)

अनेकजण आयुष्यभराची कमाई खर्च करून घर बांधतात किंवा विकत घेतात. त्यामुळेच घराची खरेदी करण्यासंबंधीचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सखोल विचार करावा लागतो. कागदपत्रे आणि अन्य सर्व बाबींची पडताळणी करण्याबरोबरच संबंधित घर संरचनात्मक दृष्टीने मजबूत आहे की नाही, याचा विचार केला पाहिजे. घराच्या टिकाऊपणासंबंधी खात्री झाल्यानंतरच व्यवहार करावा.

किती सुरक्षित आहे तुमचे घर (भाग-१)

कोणत्याही इमारतीच्या संरचनात्मक मजबुतीचा अंदाज घ्यायचा असेल, तर विकसकाचा लौकिक विचारात घ्यावा लागेल. ज्या विकसकांना बाजारपेठेत लौकिक नाही, ते कदाचित संरचनात्मक मजबुतीचा फारसा विचार न करणारे असू शकतात. काही विकसक बांधकामाचा खर्च कमी करण्यासाठी गुणवत्तेत तडजोड करू शकतात. त्यामुळेच अशा विकसकांच्या इमारतींची गुणवत्ता खात्रीलायक नसते. जर खरेदीदाराला शंका असेल, तर तो घराच्या कानाकोपऱ्याचे निरीक्षण करू शकतो. गुणवत्तेत केलेल्या तडजोडींचा अंदाज काही प्रमाणात अशा वरवरच्या निरीक्षणातूनही येऊ शकतो. काही ठिकाणी असमान मोजमापे, भिंतींमधील भेगा, पाण्याची गळती अशा बाबी चटकन सामान्य माणसालाही दिसू शकतात. असे दिसल्यास एकंदर बांधकामच निकृष्ट प्रतीचे आहे हे ओळखावे.

चांगल्या विकसकाच्या लौकिकाचा खरा आरसा त्याने बांधलेल्या इमारतींचा दर्जा हाच असतो. गुणवत्तापूर्ण बांधकाम करताना समग्र डिझाइनबरोबरच प्रत्येक खोलीतील मोजमापांमधील समानतेचाही गांभीर्याने विचार केलेला असतो. कोणत्याही इमारतीचा संरचनात्मक मजबूतपणा, टिकाऊपणा केवळ निष्णात इंजिनिअरच योग्य प्रकारे करू शकतो. याखेरीज खरेदीदारानेही इमारतीचे बाह्य आणि अंतर्गत स्वरूप पाहताना त्याचा अंदाज घेत राहायला हवे. बाह्य किंवा अंतर्गत भिंतींमध्ये भेगा दिसणे हा इमारतीच्या दर्जाविषयी शंका घेण्याचा पहिला निकष असतो. अन्य संकेतां- मध्ये दरवाजे-खिडक्‍या जाम होणे, फरशी किंवा भिंतींच्या रचनेत चढउतार, असमतोल दिसणे अशा बाबी येतात. त्यावरून दर्जाचा अंदाज सामान्य खरेदीदारालाही प्राथमिक स्वरूपात घेता येतो. कोणत्याही घरासाठी किंवा इमारतीसाठी वापरलेल्या कॉंक्रिटची गुणवत्ता ते कोणत्या ग्रेडचे वापरले आहे, यावरून निश्‍चित होते. त्याचबरोबर सिमेंट आणि वाळूच्या मिश्रणाचे प्रमाण काय आहे, हेही कॉंक्रिटच्या गुणवत्तेसाठी पाहिले जाते. कॉंक्रिट तयार होण्यासाठी आणि सुकण्यासाठी योग्य वेळ (क्‍यूरिंग पीरिअड) दिला गेला आहे की नाही, हेही पाहावे लागते.

इंजिनिअरच्या साह्याने अशा प्रकारची तपासणी केल्यास तो संपूर्ण इमारतीची पाहणी करून आपल्याला अहवाल देतो आणि त्यामुळे आपल्याला इमारतीच्या मजबुतीबाबत निर्धास्त राहता येते. एखाद्या विकसकाला आपला ब्रॅंड प्रस्थापित करण्याची इच्छा असते, तेव्हा तो प्रत्येक बारीकसारीक बाबींवर स्वतः देखरेख करतो आणि केवळ ठेकेदारावर अवलंबून राहात नाही. गुणवत्ता नियंत्रणाची व्यवस्था तो स्वतंत्रपणे विकसित करतो. गुंतवणूक वाढेल या धास्तीने तो गुणवत्तेत कोणतीही तडजोड करीत नाही. त्याच्या इमारतींच्या गुणवत्तेमुळेच एक चांगला विकसक म्हणून त्याला बाजारपेठेत प्रतिष्ठा प्राप्त होत असते. भविष्यातील योजनांमध्ये त्याला या प्रतिष्ठेचा लाभ मिळत असतो आणि विशेष प्रयत्न न करता मोठा ग्राहकवर्गही त्याला बांधकामातील गुणवत्तेमुळेच लाभत असतो.

कोणत्याही इमारतीच्या संरचनात्मक मजबुतीचा अंदाज घ्यायचा असेल, तर विकसकाचा लौकिक विचारात घ्यावा लागेल. ज्या विकसकांना बाजारपेठेत लौकिक नाही, ते कदाचित संरचनात्मक मजबुतीचा फारसा विचार न करणारे असू शकतात. काही विकसक बांधकामाचा खर्च कमी करण्यासाठी गुणवत्तेत तडजोड करू शकतात. त्यामुळेच अशा विकसकांच्या इमारतींची गुणवत्ता खात्रीलायक नसते. जर खरेदीदाराला शंका असेल, तर तो घराच्या कानाकोपऱ्याचे निरीक्षण करू शकतो. गुणवत्तेत केलेल्या तडजोडींचा अंदाज काही प्रमाणात अशा वरवरच्या निरीक्षणातूनही येऊ शकतो. काही ठिकाणी असमान मोजमापे, भिंतींमधील भेगा, पाण्याची गळती अशा बाबी चटकन सामान्य माणसालाही दिसू शकतात. असे दिसल्यास एकंदर बांधकामच निकृष्ट प्रतीचे आहे हे ओळखावे.

चांगल्या विकसकाच्या लौकिकाचा खरा आरसा त्याने बांधलेल्या इमारतींचा दर्जा हाच असतो. गुणवत्तापूर्ण बांधकाम करताना समग्र डिझाइनबरोबरच प्रत्येक खोलीतील मोजमापांमधील समानतेचाही गांभीर्याने विचार केलेला असतो. कोणत्याही इमारतीचा संरचनात्मक मजबूतपणा, टिकाऊपणा केवळ निष्णात इंजिनिअरच योग्य प्रकारे करू शकतो. याखेरीज खरेदीदारानेही इमारतीचे बाह्य आणि अंतर्गत स्वरूप पाहताना त्याचा अंदाज घेत राहायला हवे. बाह्य किंवा अंतर्गत भिंतींमध्ये भेगा दिसणे हा इमारतीच्या दर्जाविषयी शंका घेण्याचा पहिला निकष असतो. अन्य संकेतां- मध्ये दरवाजे-खिडक्‍या जाम होणे, फरशी किंवा भिंतींच्या रचनेत चढउतार, असमतोल दिसणे अशा बाबी येतात. त्यावरून दर्जाचा अंदाज सामान्य खरेदीदारालाही प्राथमिक स्वरूपात घेता येतो. कोणत्याही घरासाठी किंवा इमारतीसाठी वापरलेल्या कॉंक्रिटची गुणवत्ता ते कोणत्या ग्रेडचे वापरले आहे, यावरून निश्‍चित होते. त्याचबरोबर सिमेंट आणि वाळूच्या मिश्रणाचे प्रमाण काय आहे, हेही कॉंक्रिटच्या गुणवत्तेसाठी पाहिले जाते. कॉंक्रिट तयार होण्यासाठी आणि सुकण्यासाठी योग्य वेळ (क्‍यूरिंग पीरिअड) दिला गेला आहे की नाही, हेही पाहावे लागते.

– अंकिता कुलकर्णी

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)