पिंपरी – शहरामध्ये “स्वाईन फ्लू’चा धोका वाढू लागला आहे. वातावरणामध्ये अचानक झालेला बदल लक्षात घेता शहरामध्ये स्वाईन फ्लू आजार फोफावत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाय योजना करताना दिसून येत नाही. ऑगस्ट महिन्यातच आठ रुग्ण दगावल्याने शहरामध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासन आणखी किती बळी जाण्याची वाट पाहणार, असा सवाल शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.

याबाबत अतिरिक्‍त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना निवेदन देण्यात आले. नगरसेवक निलेश बारणे, पिंपरी विधानसभा शिवसेना शहर संघटक जितेंद्र ननावरे, समन्वयक किरण मोटे, विभाग प्रमुख राजेश वाबळे, रवींद्र ओव्हाळ, शरण शिंगे, मनोज मातंग, राहुल कांबळे, गणेश झाडे आदी उपस्थित होते.

शहरात गेल्या पंधरा दिवसात आठ रुग्ण बळी गेल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक “स्वाईन फ्लू’ बाधितांवर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. शहरात मागील वर्षी एकसष्ठ रुग्ण दगावले होते. जानेवारी 2018 ते जुलै अखेरपर्यंत फक्त एक रुग्ण दगावला होता. परंतु, ऑगस्ट महिन्याच्या पंधरा दिवसाच्या कालखंडात तब्बल आठ रुग्ण दगावल्याने परिस्थिती हालाखीची होत चालली आहे. याबाबतीत प्रशासनाने काळजीपूर्वक गंभीर विचार करून होर्डिंग, परिपत्रक, जनहितार्थ प्रबोधन, शालेय स्तरावर जनजागृती करणे व शहराच्या लोकसंख्येच्या दृष्टीने टॅमी फ्लूच्या गोळ्यांचा योग्य मुबलक साठा करून ठेवणे गरजेचे आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)