कितीही गुन्हे दाखल करा, चुकीची कामे रोखणारच

अतुल बेनके ः दर्जेदार रस्त्यासाठभ वारुळवाडीत ग्रामस्थांसह राष्ट्रवादी रस्त्यावर

नारायणगाव -जुन्नर तालुक्‍यातील रस्त्याची कामे चांगल्या दर्जाची झाली नाही, तर मस्तवाल लोकप्रतिनिधींना जवाबदार न धरता संबंधित सरकारी विभागाच्या अधिकाऱ्यांना जवाबदार धरून त्यांना वठणीवर आणले जाईल. तसेच नागरिकांच्या हितासाठी आमच्यावर गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकण्याची धमकी लोकप्रतिनिधी देत आहेत. मात्र त्याला न घाबरता आम्ही चुकीची कामे रोखणारच, असा इशारा राष्ट्रवादीचे युवा नेते अतुल बेनके यांनी दिला आहे.
वारूळवाडी -गुंजाळवाडी ते निमदरी रस्त्याची दुरवस्था झाल्याने आज (दि. 13) वारूळवाडी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस व ग्रामस्थांनी रस्ता रोको केला. दरम्यान जुन्नर सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता माने यांनी लेखी पत्र दिल्याने रस्ता रोको तात्पुरता स्थगित करण्यात आला. वारूळवाडी व गुंजाळवाडी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते अतुल बेनके, गुंजाळवाडीचे उपसरपंच श्रीकांत वायकर, वारूळवाडीचे उपसरपंच सचिन वारुळे, तलाठी सोनवणे, विकास दरेकर, हरिभाऊ वायकर, अशोक दरेकर, चंद्रकांत भोर, रवींद्र तोडकर, अमित बेनके, सूरज वाजगे, राहुल गावडे, अजित वाजगे, सुधीर सोलाट, परशुराम वारुळे, राजेंद्र मेहेर, विपुल फुलसुंदर, संदीप वारुळे, विजय घेंगडे, अजित वाजगे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या निवेदनात वारूळवाडी ते गुंजाळवाडी रस्ता अनेक वर्षे दुर्लक्षित झाल्याने रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यावरून शेतकरी, ग्रामस्थ, विद्यार्थी, व्यापारी ये-जा करीत असतात. प्रवास करताना खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. काही जणांना मणक्‍याचा, मानेचा व पाठीचे आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामस्थ या खड्ड्यांच्या रस्त्यामुळे हैराण झाले आहेत. या रस्त्यासाठी दोन कोटी मंजूर होऊनही अद्यापही काम सुरू नाही.
निवेदन दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता माने यांनी लेखी आश्वासन दिले की, उद्या दि. 14 जानेवारीला खड्डे दुरुस्त करून 20 जानेवारीला वर्क ऑर्डरनुसार कामाला सुरुवात केली जाईल. रस्त्याचे काम दर्जेदार केले जाईल.

  • जि. प. सदस्या काच बंद करून गावातून जातात
    गुंजाळवाडी ग्रामस्थांनी आरोप केला आहे की, गेली दहा वर्षे झाली या विभागाचे खासदार आमच्याकडे फिरकले सुद्धा नाही. लोकांच्या काय अडीअडचणी आहेत, याकडे दुर्लक्ष आहे. जि. प. सदस्या गुंजाळवाडीतून त्यांच्या गावाला ये-जा करतात. पण त्यांनाही रस्त्यांची दुरवस्था दिसत नाही. गाडीची काच बंद करून गावातून जातात. फक्त मते मागण्यासाठी गावात येतात. निवडून येतात, त्यानंतर दुर्लक्ष करतात.
  • जुन्नर तालुक्‍यात रस्त्यांची कामे करण्यासाठी लोकप्रतिनिधींना कमिशन द्यावे लागत आहे. पिंपरी पेंढार येथे काही दिवसांपूर्वी लोकप्रतिनिधी यांनी कमिशन मिळाले नाही म्हणून दम देऊन रस्त्याचे काम बंद पाडले होते. कमिशनचे पैसे स्वनिधी म्हणून द्यायचे आणि लोकांना भावनिक करायचे. हा धंदा सुरू केला आहे.
    -अतुल बेनके, उपाध्यक्ष प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)