कितीही आघाड्या झाल्या तरी सरकार भाजपचेच येणार !- रावसाहेब दानवे

कोल्हापूर: कितीही आघाड्या झाल्या तरी सरकार भाजपचेच येणार असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण राज्याचा दौरा करत असून आत्तापर्यंत 36 मतदारसंघांचा दौरा पूर्ण झाला आहे. युती संदर्भातील जागा वाटपाचा फॉर्मुला बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे असल्यापासून ठरलेला आहे. त्यामुळे मतांचे विभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांची युती झालीच पाहिजे, असे दानवे यांनी स्पष्ट केले.

भाजप, शिवसेनेत युती व्हावी ही जनतेची इच्छा आहे. जनतेच्या भावनेचा आदर म्हणून शिवसेनेसह समविचारी पक्षाशी युती करुन लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढविण्याची भाजपची भूमिका आहे. मात्र जे सोबत येणार नाहीत, विरोधात जातील त्यांना आडवे करण्याची ताकत पक्षात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)