किचनमधील सिंक निवडताना…

स्वयंपाकघरामध्ये स्त्रिया बहुतांश वेळा ओटा, कपाटे यांच्यावर लक्ष देतात. मात्र, स्वयंपाकघरातील भांडी धुण्याचे सिंक मात्र तसे दुर्लक्षित राहाते. खरे पाहता, सिंक हा किचनमधला महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळेच किचन सिंक निवडताना काही गोष्टी लक्षात घ्याव्यात.

स्वयंपाकघरात सर्वसाधारणपणे स्टिलच्या सिंकचा वापर केला जातो. सौंदर्य आणि स्वच्छता याचा विचार करता तेच योग्य आहे. कमी गेज किंवा जाडीचे स्टिलचे सिंक मजबूत असते तर जास्त गेजचे हलके आणि कमजोर असते. आपल्या गरजेनुसार योग्य गेजच्या स्टिलचे सिंक लावावे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पूर्वीचे सिंक लोखंडाचे म्हणजे कास्ट आयर्नचे असायचे. त्याची स्वच्छता करणे अवघड होते. त्यामुळे त्याला चिनीमातीचे आवरण लावले जात असे. हल्ली ग्रॅनाईट किंवा क्वाार्जचे सिंक मिळतात. सौंदर्य आणि टिकाऊपणा यात हे सिंक अव्वल ठरतात.

सिंक कोणत्या धातूचे असावे हे ठरवल्यानंतर आपल्या गरजेनुसार आणि स्वयंपाक घराच्या आकारानुसार सिंकचा आकार निवडावा. सिंगल बेसिन सिंक किंवा डबल बेसिक सिंक असे प्रकार यामध्ये मिळतात. सिंगल बेसिन सिंकमध्ये एकच सिंक असते, त्यात मोठी भांडी ठेवण्यासाठी पुरेशी जागा असते. ड्रेन बॉर्डबरोबरही ते मिळू शकते.

डबल बेसिन सिंकमध्ये 2 बेसिन असतात, पण त्यासाठी जागा आणि बजेटही थोडे जास्त हवे. हे बेसिन सिंगल बेसिनच्या तुलनेत लहान असते, पण त्याचे फायदे असतात. एका सिंकमध्ये खरकटी भांडी ठेवू शकता आणि दुसऱ्या सिंकमध्ये काम करू शकता. जसे तांदूळ धुणे, भाजी धुणे इत्यादी. याखेरीज बाजारात 3 बेसिन असणारी सिंक मिळतात पण ती घरगुती वापरात दिसत नाहीत.

फार्म हाऊस किंवा अॅॅप्रेन फ्रंट सिंकमध्ये सिंकचा समोरचा भाग उघडा असल्याने स्वच्छता करण्यासाठी अधिक जागा मिळते.

टॉप माऊंट सिंक हे ओट्याच्या वर असते. ते बसवणेही सोपे असते. पण सौंदर्यदृष्टीने पाहता ते चांगले वाटत नाही.

अंडर माऊंट सिंक हे ओट्याच्या उंचीपेक्षा खालच्या बाजूला असते. त्यामुळे हल्ली फ्लॅटमध्ये ह्याच प्रकारची सिंक पाहायला मिळतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)