किंग्ज इलेव्हन पंजाबच्या सामन्यांची ठिकाणे बदलली!

मोहाली : आयपीएल फ्रँचायझी किंग्ज इलेव्हन पंजाबने या मोसमात काही बदल केल्याची घोषणा केली. त्यामुळे आता लीगमधील पहिले तीन सामने आता मोहालीत खेळवले जातील. तर उर्वरित चार सामने दुसरे होमग्राऊंड इंदूरमध्ये खेळवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यापुर्वी पंजाबचे सुरुवातीचे तीन सामने इंदूरमध्ये, तर उर्वरित सामने मोहालीत खेळवण्यात येणार होते.

”दुर्दैवाने कार्यक्रमात एवढ्या उशिरा आम्हाला बदल करावा लागला,” असं पंजाब संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश मेनन म्हणाले. ”अडचणी नेहमीच तुमच्या समोर असतात. अशा परिस्थितीतही मोहालीतून लीगची सुरुवात करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, कारण, दोन्हीही आमचेच होमग्राऊंड आहेत,” असंही ते म्हणाले.

या बदलांनंतर आता मोहालीच्या मैदानावर पंजाबचा पहिला सामना 8 एप्रिल रोजी होईल. यापूर्वी हा सामना दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानात खेळवण्यात येणार होता. यानंतर मोहालीत 15 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सामना होईल, तर 19 एप्रिलला मोहालीत सनरायझर्स हैदराबादविरुद्ध टक्कर असेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)