किंगफिशर गर्ल्स जाणार विजय मल्ल्याच्या लग्नाला?

9 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेऊन भारतातून फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या तिसरे लग्न करणार असल्याचे वृत्त आहे. तो आपली गर्लफ्रेंड पिंकी लालवाणीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. या आधीही मल्ल्याची दोन लग्न झाली असून, एअर होस्टेस समीरा त्याबजी आणि रेखा मल्ल्या ही विजय मल्ल्याच्या पूर्वपत्नींची नावे आहेत. दरम्यान आता मल्ल्याच्या तिसऱ्या लग्नाला एक्‍स किंगफिशर कॅलेंडर गर्ल्स उपस्थित राहणार का? या प्रश्नाची सर्वत्र चर्चा आहे.
या एक्‍स किंगफिशर गर्ल्स कोणी साध्यासुध्या मॉडेल नसून बॉलिवूडमधल्या आजच्या आघाडीच्या अभिनेत्री दीपिका पदुकोण, कतरिना कैफ आणि नरगिस फाखरी आहेत. यांनी कधीकाळी किंगफिशरच्या हॉट कॅलेंडरसाठी फोटोशूट केले होते.

किंगफिशरच्या कॅलेंडरसाठी दीपिका पादुकोणने बिकीनी फोटोशूट केले होते. त्यानंतर शाहरूख खानसोबत “ओम शांती ओम’ चित्रपटातून बॉलिवुडमध्ये पर्दापण केले. सध्या बॉलीवुडमधील टॉप अभिनेत्रीमध्ये तिची गणना केली जाते. तसेच विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्याला सुद्धा तिने डेट केले आहे. त्यामुळे यासंबंधाबाबत मीडियामध्ये खूपच चर्चा आहे. दीपिका आणि सिद्धार्थ या दोघांना आयपीएलच्या सामन्यातही अनेकदा एकत्रित पाहण्यात आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)