नवी दिल्ली – कॉंग्रेस आणि गांधी परिवाराचे विजय मल्ल्याबरोबर जवळीकीचे संबंध आहेत. बुडित निघालेल्या किंगफिशर एअरलाईन्सचे मालक राहुल गांधी आहेत असे वाटते. गांधी परिवाराचा किंगफिशर एअरलाईन्सशी संबंध होता. कागदपत्रांवरुन किंगफिशर एअरलाईन्सची मालकी मल्ल्याकडे नव्हे तर गांधी परिवाराकडे असल्याचे दिसते, असा गंभीर आरोप भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत केला.

संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत कागदपत्रांचा एक गठ्ठा आणला होता. त्यातील त्यांनी एक पान वाचून दाखवले. हे पान म्हणजे कॉंग्रेस आणि विजय मल्ल्या यांच्या संबंधांचा एक पुरावा आहे, असे त्यांनी सांगितले. कॉंग्रेस प्रणीत संपुआ सरकारच्या काळात 2008 आणि 2012 असे दोन वेळा किंगफिशर एअरलाईन्सच्या कर्जाची फेररचना करण्यात आली.

दुसऱ्यांदा सरकारच्या विनंतीवरुन मल्ल्याच्या कर्जाची फेररचना करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. संपूर्ण गांधी कुटुंब किंगफिशर एअरलाईन्सच्या बिझनेस क्‍लासमधून मोफत प्रवास करायचे, असा आरोपही त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)