…. किंकाळ्या आणी रक्ताचे सडे

पुणे – जुन्या बाजाराजवळील शाहीर अमरशेख रस्ता हा नेहमीच गजबजलेला असतो. आरटीओ, पुणे रेल्वे स्थानक आणी शनिवारवाड्याकडे या चौकातून मार्ग जातात. यामुळे येथे दिवस रात्र प्रचंड वाहनांची संख्या असते. शुक्रवारी दुपारीही हा रस्ता असाच वाहत होता. आरटीओकडून सुटलेला सिग्नल थांबताच मागून आलेल्या सहा रिक्षा दोन दुचाकी आणी एक कार अशी वाहने तेथे थांबली. आणी अचानक मोठे होर्डिंग्ज त्यांच्या अंगावर पडले. सिग्नलला थांबलेल्या समोरच्या वाहनचालकांनी हे दुश्‍य पहाताच त्यांच्या अंगाचा थरकापच उडाला. होर्डिंग्ज पडताच रक्‍ताचे सडे उडताना दिसले. यामुळे मोठी दुर्घटना असल्याचे लक्षात येताच काही वाहन चालक वाहने जागेवरच सोडून तेथे धावले तर आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांनीही तेथे धाव घेतली.

घटनास्थळी गंभीर अवस्थेत मदतीची याचना करताना रिक्षातील कारमधील चालक व प्रवाशी दिसत होते. तर दुचाकीवरील एक व्यक्तीच्या डोक्‍याचा चेंदामेंदा झालेला होता. हे दुश्‍य ह्दय पिळवटून टाकणारे होते. त्याही अवस्थेत नागरिकांनी धीर दाखवत मदतीला सुरवात केली. स्थानिक नागरिक लक्ष्मण धनगर, राकेश लवांगडे, राहूल कांबळे आणी संजय भरगुडे यांनी तेथे धाव घेत रिक्षातील जखमींना बाहेर काढले. यानंतर थोड्याच वेळा अग्निशामक दल, पोलीस आणी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.

-Ads-

… काही कळायच्या आतच चक्कर येऊन पडलो

सिग्नललला होर्डिंग्जखाली सापडलेला रिक्षा चालक कैलास गायकवाड हा त्याचे दाजी अनिल भिसे आणी मावस भाऊ नवनाथ फणसे यांना घेऊन आरटीओमध्ये रिक्षा पासिंगला आला होता.पासिंगचे काम झाल्यावर ते पुन्हा घरी परतत असताना सिग्नल लागल्याने रिक्षा सिग्नलला थांबवण्यात आली. तेवढ्यात डोक्‍यावर काहीतरी जड पडून कैलास गायकवाड बेशुध्द झाले. तर अनिल व नवनाथ यांच्या डोक्‍याला मार लागला.

रिक्षा सिग्नलला थोडी पुढे असल्याने हा अपघात त्यांच्या जीवावर बेतला नाही. नागरिकांनी त्यांना रिक्षातून बाहेर काढल्यावर त्यांनी स्वत: दवाखान्यात जाऊन प्रथमोपचार घेतले. यानंतर ते रिक्षा पहाण्यासाठी घटनास्थली आले. तेथे ही दुर्घटना मोठी असून यामध्ये काहींचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्यांच्याही काळजाचा ठोका चुकला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)