का आणि कसा साजरा केला जातो ख्रिसमस

पाश्चिमात्य देशात ख्रिश्चन लोक मोठ्या प्रमाणात आहेत, म्हणून तेथे हा एक मोठा सण मानला जातो. आपल्याकडच्या दिवाळीसारखा साजरा केला जातो. ख्रिसमस हा सण १२ दिवस साजरा केला जातो. ह्या दरम्यान बागेत, चर्चमध्ये एकत्र येऊन, मेणबत्त्या लावून ख्रिसमस गीत (कॅरोल) म्हटले जाते. २४-२५ डिसेंबरची रात्र ही या सणातील महत्त्वाची असते. कारण त्यावेळी “येशू ख्रिस्ताचा” जन्म होतो. या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थनासभा आयोजित केल्या जातात. आणि लहान मुलांसाठी २४ डिसेंबरची अर्धी रात्र महत्वाची आणि आनंद देऊन जाणारी रात्र असते. जेव्हा सांताक्लॉज घराच्या चिमणीच्या (धुराडे) आत घुसून झोपलेल्या मुलांच्या टांगलेल्या मोज्यांत खेळणी टाकतो. त्या वेळी घरातल्या प्रत्येकासाठी ख्रिसमस ट्री वर काहीतरी गिफ्ट टांगलेले असते. २५ डिसेंबरला उठल्यावर पहिल्यांदा लोक त्या भेटवस्तू बघतात. तसेच ह्या दरम्यान घरातल्या पाळीव प्राण्यांनाही त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू देण्यात येतात.

ख्रिसमसच्या दिवशी घरामध्ये आणि नातेवाइकांमध्ये प्रत्येक रात्री मेजवानी असते. त्यात मुख्य अतिथी म्हणून घरची मोठी माणसे असतात. मित्र आणि आप्तेष्ट या मेजवानीत सामील होऊन मौजमजा करतात. ख्रिसमसच्या दरम्यान हे १२ दिवस अतिशय आनंद देऊन जाणारे असतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बहुतेकांना हा “येशू” नावाचा व्यक्ती कोण आहे, आणि त्याचा जन्मदिन का साजरा केला जातो हे अजिबातच माहित नसते. तर काहींच्या मते येशू हे एक समाजसुधारक होते, ते एक तत्त्वज्ञानी होते, ते एक यहूदी शिक्षक होते, येशू हा अमेरिकेचा देव आहे किंवा येशू हे ख्रिस्ती धर्माचे संस्थापक आहेत असे वाटते. पण परमेश्वर प्रेरित पवित्र शास्त्रात आपल्याला त्याचे जीवन चरित्र वाचायला मिळते. त्यांचे जीवन अद्वितीय होते आणि म्हणूनच नाताळ हा एक अद्वितीय सण म्हणून ओळखला जातो.

प्रभू येशू यांचा अद्वितीय जन्म आणि मृत्यू : जगाला पापमुक्त करण्यासाठी सृष्टीच्या निर्माणकर्त्या परमेश्वराने त्याच्या नेमलेल्या वेळी आपल्या एकुलत्या एक पुत्राला म्हणजेच “प्रभू येशू”ला या जगात पाठवले. अर्थातच प्रभू येशू यांचा जन्म योगायोगाने झाला नसून त्यांचे विचार मांडले गेलेत आहेत. येशू ख्रिस्त यांचा जन्म “मरिया नामक एका इस्त्राएली” कुमारिकेच्या पोटी झाला. त्यांच्या जन्माच्या ठिकाणाविषयी मीखा नावाच्या सेवकाने भविष्यवाणी केली होती, की बेथलहेम गावी येशूचा जन्म होईल आणि तसेच झाले. अशाप्रकारे कित्येक भविष्यवाण्या पूर्ण झाल्यात. हा जन्म एक काल्पनिक कथा नसून सत्य घटना आहे. आणि या जन्मामुळेच आपली दिनदर्शिका इसविसन आणि इसवीसनपूर्व अशी दोन भागात विभागलेली असल्याचे दिसून येते.

प्रभू येशूने त्यांच्या सेवाकार्याच्या दरम्यान त्यांनी अनेक आजारी लोकांना बरे केले, विविध प्रकारचे रोग आणि व्यथा ह्यांनी पीडलेले, भूतग्रस्त अशा सर्व लोकांना त्यांनी बरे केले. कित्येक आजारी लोकांना त्यांनी मरणाच्या दारातून मगरी आणले.प्रभू येशूला नैसर्गिक मरण आले नाही. इझ्राएल देशातील यहूदी पुढाऱ्यांनी त्यांच्यावर चुकीचे आरोप ठेऊन रोमी शासकातर्फे “वधस्तंभावरचे क्रूर” मरण सोसण्यासाठी रोमन सैनिकांकडे सोपवून दिले, प्रभू येशू त्यांच्या तावडीतून सहज सुटू शकले असते मात्र संपूर्ण मानवजातीसाठी त्यांचे रक्त सांडणे अगत्याचे होते म्हणून त्यांनी हे मरण स्वीकारले.

सांताक्लॉज आहे तरी कोण : मुलांचा लाडका सांताक्लॉज हा “फिनलॅन्डच्या लेपलॅन्ड प्रदेशात राहतो.” फिनलॅन्ड प्रदेशात डिसेंबरमध्ये ध्रुवप्रदेशीय रात्रीचा काळ आहे. या दरम्यान सुर्योदय होतच नाही २४ तासांमध्ये फक्त २ तासांसाठी आकाश थोडेसे उजळते आणि पुन्हा रात्रीसारखा अंधार पडतो. पण या प्रदेशावर बाराही महिने ख्रिसमसचे वातावरण असते. कारण सांताक्लॉज येथेच रहातो ना. येथे रेनडियर नावाचे प्राणीही आहेत. त्यांची गाडी सांताक्लॉजचे वाहन असल्याचे आपल्याला दिसून येते. सांताला क्रिसमच्या दरम्यान वर्षभर जगभरातून अनेक लहान – लहान मुलांची पत्रे येतात. त्यांची संख्या जवळजवळ ७ लाखापर्यंत असते. तरीही प्रत्येकाला तो उत्तर पाठवतो. ही उत्तरेही ‘एल्फ’ अक्षरात लिहिलेली असतात. आणि विशेष म्हणजे या पात्रंवर ‘उत्तर ध्रुव पोस्ट ऑफिसचा’ शिक्काही देखील असतो. इथे दरवर्षी ४-५ लाख लोक सांताला भेटायला येत असतात.

– ऋषिकेश जंगम


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)