काही सेंटीमिटर्सची घाई विजयापासून दूर जाई

भारत-वेस्ट इंडीज दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा पूर्ण करत आपल्या विक्रमांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. सामना कसा उत्कंठावर्धक, घशाला कोरड पाडणारा झाला हे मी सांगायला नको. विराट कसला बेफाट खेळला, हेही सांगणार नाही. विराटने मोडलेल्या रेकॉर्ड्सची बाकीची यादी आपल्याला कोठेही पहायला मिळेल. पण विराटकडून अनावधानाने घडेलेल्या एका विक्रमाबद्दल(?)तुम्हाला कदाचित कोणीही सांगणार नाही.

क्रिकेटच्या इतिहासात विराट कोहली हा असा पहिला कर्णधार आहे. ज्याच्या नेतृत्वाखाली एक सामना ‘टाय’ झाला. ज्यात त्याने फलंदाज म्हणून एक धाव अपूर्ण (Run Short) धावल्याने पंचांनी ती वजा केली! पहा ही काही सेंटिमिटर्सची घाई (किंवा दुर्लक्ष) किती महागात पडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काही महिन्यांपूर्वी, मी रेडियोवर ‘Cricket & Investments’ या विषयावर आठवडाभर गप्पा मारल्या, दोघांतील साम्यस्थळे सांगितली. आज आणखी एक सांगायचा मोहआवरत नाही. आपण गुंतवणुकीची बॅटिंग अगदी फॉर्ममध्ये करत असतो. पीच सोपे असते, चौकार षटकार बसत असतात. मात्र एखाद्या क्षणीच आपले चित्त विचलीत होते. आपण ‘लक्ष्मणरेषेकडे’ (Crease) न पहाताच धावू लागतो. परिणामी सारे काही मनासारखे घडूनही निखळ यश पदरात पडत नाही चालायचेच. अं हं.. सॉरी, मला म्हणायचंय नाही चालणार. आपण तोकडे (शॉर्ट)  न पडता उद्दीष्टांची रेषा पारच करायला हवी आणि ‘साम्यस्थळांचा’ विषय निघालाच आहे, तो चटकन मनात आलेला एक विरोघाभास. तो तरी मनांत कशाला ठेवू? सांगून टाकतो.

विराटने 10,000 चे शिखर सर केले ते पुन्हा कधीही न गमावण्याकरिता दुर्दैवाने निफ्टीचे मात्र तसे नाही. (टीप – श्री मोहनदास मेनन, प्रख्यात आकडेवारी तज्ज्ञ माहिती देतात. 2011च्या वर्ल्ड्कपमधील भारत/इंग्लंड यांच्यातील सामना ‘टाय’ झाला होता. तेव्हा भारताकडून मुनाफ पटेलने एक घाव तोकडी घेतली होती.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)