काही शब्द…

लपवून ठेवले आहेत तुला
Impress करण्यासाठी

काही ओळी विणायच्या
राहिल्यात
येणाऱ्या आठवणी गुंफण्यासाठी…

एक काळा शर्ट अजुन
तसाच प्रेस करुन ठेवलाय
तुझी compliment ऐकण्यासाठी.

मला महितीये टाईमावर Auto मिळणार नाही
म्हणून आधीच Ola चे App download करुन
ठेवले मी ontime पोहचण्यासाठी.

ते गाणे आठवतय का तुला..??
मी मुद्दाम  रिंगटोन सेट करुन ठेवलय
तु पुन्हां ऐकावे यासाठी.

चंदूला सांगून ठेवलयं मला बरोबर
2.30 ला call कर चावी कुठे ठेवलीये हे
विचारण्यासाठी.

शाहिदच्या नवीन Hairstyle चा एक फोटो dowload करून ठेवलाय त्या नाव्ह्याला दाखवण्यासाठी.

दाडी पण  ट्रिम करायचीये ,थोडा confused झालोय.
ताईला विचारलं वाट बघतोय तिच्या रीप्लायची.

२० रुपये सुट्टे आधीच वर काढुन ठेवलेय मी
waiter ला टीप देण्यासाठी.

मी सर्वे chat डिलिट करुन ठेवलेयेत. तु जर चुकून फोन मांगीतला मला
फोटो काढण्यासाठी.

मी खूप excite झालोय
तुला भेटण्यासाठी.

काही ओळी विणायच्या
राहिल्यात
येणाऱ्या आठवणी गुंफण्यासाठी..

– सुमित धिवरे. 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
14 :thumbsup:
76 :heart:
2 :joy:
40 :heart_eyes:
29 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)