…पे ऍण्ड पार्कच्या निविदा प्रशासनाने रद्द केल्या

पुणे – शहरातील पाच प्रमुख रस्त्यांवर पे ऍण्ड पार्क योजना राबवण्यात येणार आहे. मात्र ही योजना राबवण्यासाठी शहरातील अन्य काही रस्त्यांवरील पे ऍण्ड पार्क संबंधी ठेकेदारांची आलेली निविदा महापालिकेच्या प्रकल्प विभागाने रद्द केली आहे.

यामध्ये सोहराब हॉल ते पंचशील चौक ते मोबोज हॉटेल, रुबी हॉल ते कपिला हॉटेल चौक ते कोलते पाटील इमारत ते बोटक्‍लब रोड ते हेमंत करकरे चौक हा रस्ता. तसेच कौन्सिल हॉल ते ब्लू नाईल चौक ते किराड चौक, सर फिरोजशहा मेहता चौक ते बौद्ध धर्मगुरू महास्थवीर चंद्रमणी चौक ते साधू वासवानी चौक यांचा समावेश आहे.

-Ads-

शहरात ज्या रस्त्यांवर पे ऍण्ड पार्क करण्यात येणार आहे. त्यामध्ये या रस्त्यांचा समावेश आहे का, हे अद्याप ठरले नाही. असे असताना येथील निविदा रद्द करण्यात आल्या आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)