कास फुललं पुष्प पर्यटन हंगामाचा शुभारंभ

सातारा- जागतिक नैसर्गिक वारसास्थळ असलेल्या कास पुष्प पठार विविध नैसर्गिक फुलांच्या बहरानी फुलून गेलं आहे. त्यासाठी वनविभागाच्या वतीने जगभरातील पर्यटकांसाठी यावर्षीच्या हंगामाचा शुभारंभ खा. उदयनराजे भोसले आणि आ. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी उपवनसंरक्षक डॉ.भारतसिंह हाडा, सचिन डोंबाळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

कास पुष्पपठार पठारावर पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना www.kas.ind.in या अधिकृत संकेतस्थळावर पठाराबाबतची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ऑनलाइन बुकिंगद्वारेही पठारावर प्रवेश करता येणार आहे. कास पुष्प पठारावर शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी फक्त ऑनलाइन बुकींग असणाऱ्या पर्यटकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे यादिवशी ऑनलाइन बुकिंग निश्‍चित करुनच पर्यटकांनी यावे व स्वत:ची गैरसोय टाळावी, असे आवाहन सातारा वनविभाग व कास पठार कार्यकारी समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

हंगामाच्या शुभारंभप्रसंगी कास पठार कार्यकारी समितीच्यावतीने कास पुष्प पठाराच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावातील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)