कास पुष्प पठारावर पर्यटकांची गर्दी

सुटीचा योग साधून पर्यटकांनी गाठला साडेबारा हजाराचा टप्पा

सातारा- महाराष्ट्राच्या सात आश्‍चर्यांपैकी एक असलेल्या कास पठारावर फुललेली फुले पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. शनिवार,रविवार लागुन आलेल्या सुट्टीमुळे महाराष्ट्रासह देशभरातील पर्यटकांचा ओढा वाढल्याने गत आठवड्यात साडेबारा हजार पर्यटकांनी कास पठारावर हजेरी लावल्याचे दिसून आले आहे. यापैकी साडे पाच हजार पर्यटकांनी ऑनलाइन नोंदणी केल्याची माहिती वनविभागाच्या संकेतस्थळावरील आकडेवारी वरून स्पष्ट झाले.

सततच्या पावसाने उघडीप दिल्याने कासवर फुलांचा गालिचा निर्माण झाला आहे. पर्यटकांना मोहित करणारी फुले उमलु लागली आहेत. पावसाने उघडीप दिल्याने पर्यटकांचा ओढा वाढला असला तरी परदेशातील पर्यटकांची पावले मात्र अद्याप तिकडे वळली नाही.काससह सज्जनगड,बामणोली,ठोसेघर या ठिकाणीसुध्दा पर्यटकांची गर्दी होती. सध्या पठारावर पाचगणी आमरी,कापरू,दीपकांडी,रान महुरी,सीतेची आसवे, रानवांगे,गेंद,चवर या फुलांना चांगला बहर आला आहे.

सोबतच कास पठाराच्या दक्षिणेला असलेला कास तलाव, तलावाच्या भोवतालचे घनदाट जंगल,सज्जनगड किल्ला आणि कण्हेर धरण,ठोसेघर,वजराई धबधबा पाहण्यास गर्दी होत आहे.विस्तृत पठारावर पसरलेली गर्द हिरवळ, ठिकठिकाणी फुललेले रानफुलांचे ताटवे, रस्त्याच्या कडेला कोसळणारे छोटे-मोठे धबधबे, अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरी अन्‌ दाट धुके हे काल्पनिक नव्हे तर कास पुष्प पठारावरील वास्तव मनोमोहक दृश्‍य आहे. आपल्या सौंदर्याने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान पटकावलेल्या कास पठाराला हंगामच्या पहिल्या आठवड्यातच पर्यटकांनी मोठ्या संख्येने भेटी दिल्या. मात्र फुलांचा बहर जेमतेमच आहे.

पठारावर देखरेख व मार्गदर्शनासाठी वनविभागाचे कर्मचारी तसेच कास, कासाणी, आटाळी, एकीव, पाटेघर, कुसुंबीमुरा, या सहा गावची कार्यकारिणी समिती कास पठार संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)