कास पठारावरील वनविभागाची मनमानी थांबवा:शिवसेनेची मागणी

 जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना हरिदास जगदाळे, निमिश शहा व पदाधिकारी

अन्यथा धरणे आंदोलनाचा इशारा

सातारा,दि.12 प्रतिनिधी- कास पठारावर फुलांचा हंगाम संपल्यानंतरही वनविभागाकडून शंभर रूपये आकारून मनमानी केली जात असून ती तात्काळ थांबवा, अन्यथा धरणे आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे देण्यात आला.
कास पठावरावर एका बाजूला वनविभाग आर्थिक मनमानी करीत असताना दुसऱ्या बाजूला पर्यटकांसाठी उभारण्यात आलेल्या शौचालयांमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. पर्यटकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पठारावर रूग्णवाहिका, डॉक्‍टर्स व नर्स उपलब्ध करण्याची आवश्‍यकता असताना त्याची अंमलबजावणी देखील कर÷ण्यात आलेली नाही. त्याच बरोबर कास पुष्पपठाराला घालण्यात आलेले कुंपन चुकीच्या पध्दतीने घालण्यात आलेले आहे. संबधित क्षेत्र जनावरांना चरण्यासाठीचे क्षेत्र असून फुलांचा हंगाम संपल्यानंतर कुंपण काढण्यात यावे, अशी ही मागणी यावेळी करण्यात आली. त्यावेळी उपजिल्हाप्रमुख हरिदास जगदाळे, शहरप्रमुख निमिश शहा, सचिन जगताप, दादासाहेब सुपेकर, निलेश चव्हाण आदी.उपस्थित होते.

-Ads-

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)