कास तलाव भिंतीच्या उंचीवाढीचे 35 टक्के काम पूर्ण

मे 2020 अखेर काम पूर्ण होऊन अर्धा टीएमसी पाणीसाठा होणार
सातारा, दि. 30 प्रतिनिधी
कास तलाव भिंतीच्या उंचीवाढीचे आजअखेर 35 टक्के काम झाले आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या भिंतीची पायाभरणी झाली आहे. कास योजनेच्या कामाचा वेग पाहता मे 2020 अखेर काम पूर्ण होऊन तलावात अर्धा टीएमसी पाणीसाठा होण्यास हरकत नाही, असा विश्वास पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी कास धरण पाहणीच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
पालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख राजेंद्र कायगुडे, आरोग्य निरीक्षक प्रविण यादव, दत्तात्रय रणदिवे, गणेश टोपे तसेच अभियंता सुधीर चव्हाण आदी उपस्थित होते.
गोरे यांनी सांगितले, धरणाची सध्याची भिंत 250 मीटर लांबीची आहे. तिच्यापासून सुमारे 60 मीटर अंतरावर नवीन भिंत उभारण्यात येत आहे. ही भिंती 580. 50 मीटर लांबीची असेल. भिंतीची उंची 28.70 मीटर असेल. कास धरण उंची वाढ कामासाठी सुमारे 42 कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे.
धरणात सध्या 106 दशलक्ष घनफूट पाणीसाठा होत असून उंचीवाढीचे काम पूर्ण झाल्यानंतर 500 दशलक्ष घनफूट म्हणजेच अर्धा टिएमसी पाणीसाठा होईल. हे पाणी संपूर्ण सातारा शहराला पुरून वाढीव भागालाही पुरवता येईल. पावसाळ्यामुळे ता. 4 जूनपासून काम थांबविण्यात आले आहे. हे काम दिवाळीनंतर सुरू होईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. कास तलावात सध्या 15 फूट पाणीसाठी आहे. तलावातील पाणीपातळी यावर्षीच्या उन्हाळ्यात सहा फूटांपर्यंत खालावली होती. त्यानंतर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात सुरू झालेल्या पावसाने पाणीपातळी वाढली आहे. 24 फूट पाणीसाठी झाल्यानंतर तलावाच्या सांडव्यातून पाणी वाहू लागते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)